‘या’ झाडाच्या देखभालीचा खर्च आहे १५ लाख; झाडाभोवती असतो २४ तास कडक पहारा

देशाच्या सुरक्षिततेसाठी सैनिक दिवसरात्र सीमेवर कडक पहारा देत असतात. एवढंच काय तर VIP व्यक्तींसाठीतर २४ तास सुरक्षा रक्षक तैनात असतात. परंतु भारतात असे एक झाड आहे ज्याला प्रत्येक क्षणी पहारा दिला जातो.

त्या झाडाला VIP काय त्याच्यापेक्षा जास्त खास ट्रीटमेंट दिली जाते. हे झाड जर आजारी पडले तर प्रशासन सुद्धा गोंधळून जाते. त्याचप्रमाणे या झाड्याच्या देखभालीचा वर्षाचा खर्च १२ ते १५ लाख रुपये आहे. ऐकून धक्का बसला ना.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि विदिशा दरम्यान सलामतपुरमध्ये एक झाड आहे. या झाडावर प्रशासन तब्बल १२ ते १५ लाख रुपये खर्च करत असल्याची माहिती समोर आली आहे. या झाडाच्या सुरक्षिततेसाठी आजूबाजूला १५ फूटाची जाळी लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे या झाडाला पाणी देण्यासाठी स्थानिक नगरपालिकेकडून एका पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.

या झाडाला कीड लागू नये म्हणून कृषी अधिकारी दर आठवड्याला एक दौरा करतात. या झाडाची संपूर्ण देखभाल कृषी अधिकारी करतात. या झाडाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक मोठी गर्दी करत असतात. त्यासाठी प्रशासनाने एक पक्का रस्ताही बनवला आहे.

आता या झाडाची इतकी काळजी का घेतली जाते ? त्याला कारण असे आहे की, हे साधेसुदे झाड नाहीये. हे झाड श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांनी लावले होते. हे ते झाड आहे ज्या झाडाखाली गौतम बुद्धांना मोक्ष प्राप्ती झाली होती. येथे त्या झाडाची फांदी रोवण्यात आली होती. त्या फांदीचे रूपांतर आता झाडात झाले आहे.

हे झाड गौतम बुद्धांच्या अस्तित्वाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या झाडाची खूप काळजी घेतली जाते. २१ सप्टेंबर २०१२ रोजी जे रोपटे लावण्यात आले होते. हे छोटेसे रोपटे आता मोठे झाले आहे. त्याचे वृक्षात रूपांतर होत आहे. त्याची उंची २० फूट झाली आहे.

महत्वाच्या बातम्या-
‘इंडियन आयडल १२’ मध्ये नेहा कक्कड ऐवजी अनु मलिक जज म्हणून येणार; जाणून घ्या त्यामागच कारण
कोरोना आणि हार्ट अटॅक काय आहे सबंध? कस करायचं संरक्षण? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला
जगातील सर्वात श्रीमंत जोडपं मायक्रोसाॅफ्टचे बिल आणि मेलींडा गेट्स घेणार घटस्फोट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.