भाऊ प्रल्हाद मोदींनी नरेंद्र मोदींचे पितळ पाडले उघडे; म्हणाले ते चहावाले नाहीतच!

ठाणे। आपल्या देशातील किंवा अनेक देशांतील जे यशस्वी व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या मागे काही ना काही गोष्ट ही असतेच. प्रत्येकजण शून्यातून विश्व निर्माण करत असतो. काहीजण पेपर विकून मोठे झालेले असतात, तर काही वेगेवेगळे छोटे मोठे व्यवसाय करून यशाची पायरी गाठत असतात.

अशा प्रत्येकाच्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत. या कहाणी प्रमाणे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील चहावाला असल्याचे बरेचदा ऐकले आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेकदा आपल्या भाषणात आपण चहावाला असल्याचा उल्लेख करत असल्याचे आपण पाहिले आहे.

मात्र याच दरम्यान मोदींच्या भावाने एक मोठा खुलासा केला आहे. नरेंद्र मोदी यांचे सख्खे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी नरेंद्र मोदी चहावाला नव्हते तर आमचे वडील चहावाले होते असं सांगितले आहे. त्यामुळे चक्क नरेंद्र मोदींच्या भावनेचं मोठा खुलासा केला आहे.

प्रल्हाद मोदी हे शुक्रवारी उल्हासनगर ट्रेड असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी उल्हासनगरला आले होते. त्यावेळी त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा ‘चायवाले का बेटा’ म्हणा असं प्रल्हाद मोदी म्हणाले. आम्ही सर्व भावंड मिळून चहा विकायचो. ज्यादिवशी ज्याचा नंबर लागेल, त्याच्यावर चहा विकायची जबाबदारी यायची. पण चहावाला आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते. त्यामुळे आम्ही सर्व ‘चायवाले के बेटे’ आहोत, असं ते म्हणाले.

मात्र प्रल्हाद मोदी येवढयावरच थांबले नसून नरेंद्र मोदींना चिमटा देखील काढला आहे. ते म्हणाले की आमच्या वडिलांनी चहा विकून आम्हा ६ भावंडांना मोठं केलं, पण पत्रकार नरेंद्र मोदींना ‘चहावाला’ म्हणतात, ही त्यांची चूक असून म्हणायचं असेल तर त्यांना ‘चहावल्याचा मुलगा’ म्हणा, असं प्रल्हाद मोदी म्हणाले.

त्याच सोबत नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा ‘चायवाले का बेटा’ म्हणा, असं म्हणत खुद्द नरेंद्र मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी पत्रकारांना चिमटे काढले. चहा आम्ही सर्व भावंडांनी विकला, पण ज्याचा मुकुट मोठा, पत्रकार त्यालाच चालवतात, अशा खोचक शब्दात प्रल्हाद मोदी यांनी टोला लगावला आहे. प्रल्हाद मोदी यांच्या या विधानानंतर आता सोशल मीडियावर चांगलीच कुजबुज पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
अरे बाप रे! व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून पोटात गेला ईल मासा, मग पुढे घडला हा धक्कादायक प्रकार
“आम्ही आधी शिवसैनिक, नंतर मंत्री, पक्षाने सांगीतलं तर जशास तसे उत्तर देऊन राणेंचे तोंड बंद करू”
तुम्हीही हेअर कलर करता का? करत असला तर तुम्हालाही करावा लागेल या आजारांशी सामना
मुली काही करु शकत नाही म्हणणाऱ्या लोकांना लव्हलिनचे सडेतोड उत्तर; टोकियोत भारताला मिळवून दिले पदक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.