लग्नानंतर सासरी जाणाऱ्या नवरीला नवरदेवाच्या भावाने रस्त्यातच केली मारहाण; धक्कादायक कारण आले समोर

लग्नानंतर सासरी जाणाऱ्या नवरीला सारसरच्यांनी रस्त्यातच मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सासरी येण्याआधीच नवरदेवाच्या भावाने नवरीला मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ पण सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ही घटना रिवा जिल्ह्यात घडली आहे. विशेष म्हणजे जेव्हा नवरदेवाचा भाऊ नवरीला मारहाण करत होता. तेव्हा नवरदेव तिथेच होता आणि त्या दोघांचे भांडण बघत होता. नवरदेव आणि नवरीने प्रेम विवाह केला होता, पण या लग्नामुळे नवरदेवाचा भाऊ नाराज होता, त्यामुळे त्याने नवरीला मारहाण केली आहे.

ही सर्व घटना मोहनी गावातला आहे. या गावातल्या रविराज सिंह चौहान नावाचा तरुण एका तरुणीशी प्रेम करत होता. पण घरच्यांनी लग्नाला परवानगी दिली नाही. त्यामुळे दोघांनी एका मंदीरात जाऊन लग्न केले.

लग्नानंतर दोघे पण स्कुटीने घरी जात होते, असे असताना नवरदेवाच्या भाऊन विजय बहादूर सिंहने त्यांना थांबवले. या लग्नामुळे नाराज असलेल्या भावाने त्या तरुणीला तिथेच मारहाण करण्यास सुरुवात केली. हे सर्व नवरदेवाच्या समोग घडत होते, पण तरीही तो ते बघत बसला होता.

त्यानंतर तिथल्या स्थानिक नागरीकांनी त्या तरुणीला वाचवले आहे. नवरदेव शांततेत सर्व बघत असल्याने स्थानिक लोकांना त्या माणसाला थांबवले आणि नवरीला सोडवले होते, या घटनेचा खुप व्हायरल झाला आहे.

या संपुर्ण प्रकरणानंतर नवरदेव नवरीसोबत पोलिस ठाण्यात गेला आहे आणि त्यांनी दोघांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवली असून त्या तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

4 वर्षांच्या मुलीनं मागवलं ‘इतक्या’ हजारांचं ऑनलाईन फूड, बिल बघून बापाने लावला डोक्याला हात
६ लाखात येणार भारतातील सगळ्यात सुरक्षित कार, global NCAP कडून मिळाले आहे ५ स्टार रेटींग
बाबो! रश्मिकाचा फॅन ९०० किलोमीटर प्रवास करुन आला तिला भेटायला, पण तिथं जाऊन भलतंच घडलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.