आयपीएल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; आयपीएलचे उर्वरीत सामने या देशात होण्याची शक्यता

आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच येत्या सप्टेंबरमध्ये पुन्हा आयपीएलचे नियोजन केले जाईल, असे सांगितले जात आहे.

सध्या क्रिकेट प्रेमी आयपीएल रद्द झाल्याने नाराज झालेले आहे. तसेच पुन्हा आयपीएलला सुरुवात कधी होणार, कुठे होणार असा प्रश्न सर्वांना पडत आहे. अशातच आयपीएलबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांचे नियोजन इंग्लंडमध्ये केले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयपीएलचे अजून ३१ सामने राहिलेले आहे. या सामन्यांचे आयोजन करण्यासाठी इंग्लिश काऊंटीच्यावतीने बीसीसीआयला प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

आतापर्यंत आयपीएलचे २९ सामने पार पडले आहे. त्यानंतर काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच लवकरच पुन्हा एकदा आयपीएल सामन्यांचे नियोजन करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

आता इंग्लिश काउंटीच्या एका ग्रुपने यंदाच्या आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांचे आयोजन सप्टेंबर महिन्यात करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमसीसी, सर्रे, वार्विकशायर आणि लंकशायर यांनी ईसीबीला एक पत्रा पाठवले आहे. त्यामध्ये आयपीएलचे उर्वरित सामने इंग्लंडमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

भारतीय संघ या वर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात इंग्लड दौऱ्यावर जाणार आहे. इंग्लंडविरोधात ५ कसोटी सामने खेळण्यात येणार आहे. त्यामुळे असा अंदाज वर्तवला जात आहे, की इंग्लंड विरोधातील कसोटी सामने पार पडल्यानंतर आययपीएलच्या उर्वरीत सामन्यांचे आयोजन केले जाऊ शकते.

महत्वाच्या बातम्या-

उत्तर प्रदेशमध्ये जनावरांसाठी ऑक्सिमीटर, थर्मल स्कॅनरची चोख व्यवस्था, योगींचे आदेश
वजन कमी करण्यासाठी अभिनेत्रीने केली शस्त्रक्रिया; गमवावा लागला जीव
कोरोना रुग्णांवर संत्र्याच्या बागेत उपचार; झाडाच्या फांद्यांना अडकवून देतोय सलाईन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.