मुलांना सांभाळणारी महिला कर्मचारीच बनली भक्षक; अल्पवयीन मुलांचे करत होती लैंगिक शोषण

ब्रिटनमध्ये महिलेने एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कदायकप्रकार समोर आला आहे. त्या महिला कर्मचाऱ्याकडे मुलाला सांभाळण्यासाठी पाठवले होते. पण महिलेने त्याच्यासोबत शारीरीक संबंध बनवले आणि त्याला अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप तिच्यावर आहे.

पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांनुसार न्यायालयाने महिला आरोपीला तुरुंगात डांबण्याची शिक्षा दिली आहे. लेसिस्टेशिर येथे राहणाऱ्या या महिला कर्मचाऱ्याचे नाव एशले राईट असे आहे. तिने डिसेंबर २०१८ ते जून २०१९ या काळात हा गुन्हा केला आहे.

पीडित मुलगा १५ वर्षांचा असून त्याला मिल्टन किन्स सिक्योर ट्रेनिंग फॅसिलिटी येथे पाठवण्यात आले होते, याच ठिकाणी एशले काम करत होती. तिथेच पोलिसांना त्या महिलेविरोधात पुरावे भेटले आहे. एशलेने अनेक मेसेज केले होते. ज्यामध्ये तिने अश्लील भाषेत त्या मुलाशी बोलताना दिसत होती.

तसेच एशलेने त्या मुलाला काही अश्लील फोटोही पाठवले होते. यामधले काही फोटो हे एशलेच्या घरच्या बेडरुममध्ये भेटले, तर काही फोटो त्या मुलाच्या आयपॅड आणि मोबाईलमध्ये भेटले होते, ज्यामध्ये एशलेचे अश्लील फोटो होते.

जेव्हा हे प्रकरण न्यायालयात गेले तेव्हा क्रिस्टन क्राऊन कोर्टने म्हटले, की एशलेवरचे आरोप गंभीर असून या गुन्ह्याची शिक्षा तिला झालीच पाहिजे. त्यामुळे तिला दोन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे.

तसेच १० वर्षांपर्यंत एशलेचे नाव लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांमध्ये असणार आहे. याआधीही तिच्यावर १३ आणि १५ वर्षीय मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप लागला होता. जेव्हा एका कर्मचाऱ्याने तिला लहान मुलासोबत शारीरीक संबंध बनवताना पाहिले होते, त्यानंतर हे सर्व प्रकरण समोर आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘लगान’ चित्रपटातील गौरी आठवते का? एका चुकीमूळे बॉलीवूड सोडावे लागले होते
लग्न झाले मात्र ‘या’ कारणामुळे नवरी सासरी गेली नाही, अहमदनगरमध्ये धक्कादायक घटना
काय सांगता! हिऱ्याच्या शोधात गावकऱ्यांनी खोदला डोंगर, आणि …

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.