‘शर्जील उस्मानीच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणा’, फडणवीसांचे ठाकरे सरकारला अल्टिमेटम

पुण्यात ३० जानेवारीला एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेसाठी उपस्थित असलेल्या शर्जील उस्मानीने हिंदू समाजाविषयी वादग्रस्त भाषण दिले होते. यानंतर हिंदू समाजाबद्दल केलेली अवमानजनक, आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्याची तातडीने दखल घेऊन त्यावर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहुन केली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी पत्रात काय लिहलं

“हिंदू समाज सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्या करतो.” अशा प्रकारची हिंदू समाजाची अपमान करणारी विधानं आहेत”.

या भाषणातील शब्दश: वाक्यं अशी आहेत…

‘आज का हिंदू समाज, हिंदुस्तान में हिंदु समाज बुरी तरीके से सड चुका है| ये जो लोग लिचिंग करते है, कत्ल करते है, ये कत्ल करने के बाद अपने घर जाते है तो क्या करते है अपने साथ? कोई नये तरिके से हात धोते होंगे, कुछ दवा मिलाकर नहाते होंगे| क्या करते है ये लोग कि वापस आकर हमारे बीच खाना खाते है, उठते बैठते है, फिल्में देखते है| अगले दिन फिर किसीको पकडते है फिर कत्ल करते है नॉर्मल लाईफ जीते है| अपने घर मोहब्बत भी करते है, अपने बाप का पैर भी छू रहे है, मंदिर में पुजा भी करते है, फिर बाहर आकर यही करते है…’

एक युवक राज्यात येतो, छातीठोकपणे हिंदुत्त्वावर शिंतोडे उडवतो आणि डोक्यावर मिरे वाटून निघून जातो आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही, हा प्रकार अतिशय आश्चर्यजनक आहे. समस्त राज्याच्या चिंता वाढविणारा आहे आणि सर्वांच्या माना शरमेने खाली घालायला लावणारा आहे. मला आशा आहे की, हे पत्र मिळताच त्याच्यावर गुन्हा दाखल करून, शरजीलच्या मुसक्या आवळत महाराष्ट्रात आणून, अशा विधानांचे परिणाम काय असतात, यावर कायदेशीर कारवाई करून त्याला अद्द्ल घडवाल.

खरे तर एल्गार परिषदेच्या माध्यामून गेल्याही कालखंडात काय झाले, याची जाणीव असताना, अशा आयोजनांना पुन्हा परवानगी देणे किती चुक होते, हेच शरजीलच्या विधानांतून दिसून येते. एखाद्या आयोजनाला परवानगी दिली, म्हणजे त्यात झालेले सारे प्रकार सुध्दा खपवून घ्यायचे, ही भुमिका योग्य नाही.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात कुणीही यावे आणि अशी विधाने करून वातावरण खराब करावे, हे आम्हाला मान्य नाही. ते आपल्यालाही मान्य नसेल. अशी अपेक्षा आम्ही महाराष्ट्रातील जनता आणि समस्त हिंदू समाज करतोय. या प्रकरणात कठोरातील कठोर आणि  तत्काळ कारवाईच्या अपेक्षेत! अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? वाचून थक्क व्हाल
लोकल सेवेच्या वेळापत्रकात होणार बदल? राजेश टोपेंनी केली मोठी घोषणा
मनसेमधील आऊटगोईंग थांबेना! बड्या नेत्याने केला भाजपात प्रवेश
धाडस म्हणावं कि स्टंटबाजी! ऊसतोड मजुराने बिबट्याच्या बछड्यासोबत काढले सेल्फी

 

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.