गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये वाद सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या सभेत आपल्याला अयोध्या दौऱ्यात अडकवण्यासाठी सापळा रचला जातोय, असा आरोप केला होता. यावर राज ठाकरे कधी एअरपोर्टवर भेटले तर नक्कीच त्यांना हिसका दाखवीन, अशा शब्दांत भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग(Brijbhushan Singh) धमकीवजा इशारा दिला होता.(brijbhushan singh statement on raj thakre)
आता पुन्हा एकदा भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘राज ठाकरेंचा बापही अयोध्येत येऊ शकणार नाही”, असे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग म्हणाले आहेत. भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी आज पत्रकरांशी संवाद साधला. यावेळी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर भाष्य केलं आहे.
यावेळी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, “बिहारचा बक्सर असा भाग आहे, ज्या ठिकाणी भगवान रामने शिक्षा स्वीकारली होती. विश्वमित्र याने लंका अभियानाची योजना याच ठिकाणी तयार केली होती. त्यामुळेच आम्ही अयोध्या आंदोलनासाठी या ठिकाणी पाठिंबा मागण्यासाठी आलो आहे”, असे ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सांगितले आहे.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना इशारा दिला होता. “मी राज ठाकरे यांना २००८ पासून शोधत आहे. जर राज ठाकरे कधी एअरपोर्टवर भेटले तर नक्कीच त्यांना हिसका दाखवीन”, असे भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले होते.
“राज ठाकरे यांचं आता विचार बदलला आहे. आता त्यांना अयोध्येला यायचं आहे. पण जोपर्यंत राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना अयोध्येत प्रवेश करू देणार नाही. आम्ही सगळे रामाचे वंशज आहोत आणि त्याच लोकांना राज ठाकरे यांनी अपमानित केलं आहे. त्यामुळे ज्यावेळी राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागतील, त्याचवेळी त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देऊ”, असे देखील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते, पण त्यांनी दौरा तूर्तास स्थगित केला आहे. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी सुरवातीपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला तीव्र विरोध दर्शवला होता. राज ठाकरे दबंग नाहीतर उंदीर आहेत. ते पहिल्यांदा बाहेर पडत आहेत”, अशा शब्दात भाजप खासदार शरण सिंह यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. यावर मनसे नेत्यांनी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
महत्वाच्या बातम्या :-
ऍमेझॉनच्या जंगलात सापडला २२ मीटर उंच पिरॅमिड, हेच आहे का ते सोन्याचे हरवलेले शहर?
रश्मिका मंदान्नाने घातला इतका बोल्ड ड्रेस की कॅमेऱ्यासमोर…, पहा व्हिडिओ
आरारारा खतरनाक! बैलगाडा शर्यतीसाठी कोट्यावधींची बक्षीसे; जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर, ११६ दुचाकी..