Share

“होय माझे शरद पवार यांच्यासोबत चांगले संबंध आहेत आणि मला या गोष्टीचा गर्व आहे” – ब्रिजभूषण सिंग

गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये वाद सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी पुण्यात जाहीर सभा झाली. यावेळी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. माझा अयोध्या दौरा होऊ नये याकरिता सापळा रचला जातोय, असा आरोप देखील राज ठाकरे(Raj Thakare) यांनी पुण्यातील सभेत केला होता.(brijbhushan singh statement on mns tweet)

त्यानंतर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांचा एका कार्यक्रमातील फोटो ट्विट केला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याविरोधात शरद पवार सापळा रचत आहेत, असा आरोप मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विटच्या माध्यमातून केला होता.

यावर भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग मनसेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “होय माझे शरद पवार यांच्यासोबत चांगले संबंध आहेत आणि मला या गोष्टीचा गर्व आहे. आज देखील मला शरद पवार भेटले तर मी त्यांना नजर न झुकवता प्रणाम करेन. ते माझ्यासाठी एक चांगले नेते आहेत. राज ठाकरेंनी त्यांच्याकडून शिकलं पाहिजे”, अशा शब्दांत भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी हल्लाबोल केला आहे.

भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग पुढे म्हणाले की, “शरद पवार हे देशातील मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. मी कुस्तीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत. हा कार्यक्रम पुण्यातील मावळ या ठिकाणी झाला होता आणि तो कार्यक्रम तीन वर्षांपूर्वी झाला होता. शरद पवार, सुप्रिया सुळे या कार्यक्रमाला उपस्थित होते.”

“या कार्यक्रमात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी सत्काराचा कोणताही हार स्विकारला नाही. त्यांनी सर्व हार मला घातले. कुस्तीच्या क्षेत्रामध्ये देशात जे काही काम झालं आहे. ते माझ्यामुळे झालं आहे, असं शरद पवारांना वाटतं. सुशीलकुमार आणि योगेश्वर दत्त यांना मिळालेल्या ऑलम्पिक मेडलमध्ये आमचा वाटा आहे असल्याचे सांगितले जाते”, असे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग सांगितले.

https://twitter.com/GajananKaleMNS/status/1528920823750197249?s=20&t=pM45bl6kmHdeczPyC7a0dA

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांचा मावळ येथील कुस्ती कार्यक्रमातील एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता. त्या ट्विटमध्ये मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी लिहिले की, ” ब्रिजचे निर्माते…सुज्ञास अधिक सांगणे न लगे… ( फोटो झूम करून पाहावा) “, असे ट्विट करत मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी शरद पवारांवर आरोप केले होते.

महत्वाच्या बातम्या :-
बिग ब्रेकींग! खाजगी वाहनांना टोल कायमचा माफ होणार, ‘या’ सरकारने घेतला मोठा निर्णय
नवरदेवासोबत पळून जाणं पडलं महागात, धपकन तोंडावर आदळली नवरी, पहा व्हिडीओ
‘माझा मामा ‘या’ ठिकाणी लपून बसला आहे’, दाऊदच्या भाच्याने ईडीसमोर केला मोठा खुलासा

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now