काय सांगता! गृहप्रवेशाआधीच चढला नवरीचा पारा, नवरदेवाला कानशिलात लावून परतली माहेरी

लखनऊ । लग्नानंतर सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. नवी नवरी सासरी आल्यावर तिचे स्वागत केले जाते. मात्र, उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधील एका नव्या नवरीच्या वागण्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे.

नव्या नवरीने सासरी पोहोचताच गाडीतून उतरल्यानंतर नवरदेवाच्या कानशिलात लगावली आहे. इतकेच नाही तर सासरी पोहोचताच तिने नवरीचे कपडे आणि मेकअप काढून साध्या कपड्यात आपल्या घराचा रस्ता धरला आणि माहेरी परतली. यानंतर प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. बराच वेळ पोलिसांनी समजविण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच पर्याय निघाला नाही.

सासरी स्वागताच्या वेळीच नवरीने केलेल्या या कृत्यामुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली. ही बातमी संपूर्ण गावात आगीसारखी पसरली आणि आतापर्यंत केवळ अंदाज लावले जात आहेत. ही संपूर्ण घटना प्रेम प्रकरणामुळे झाल्याचे म्हटले जात आहे. या घटनेमुळे मुलांच्या घरच्यांना धक्काच बसला आहे.

नवरदेवाची वरात नवरीच्या घरी पोहोचली तेव्हा अगदी आनंदात हा विवाहसोहळा पार पडला. नवरीनेही शांतपणे नवरदेवासोबत सात फेरे घेतले. मात्र, दुसऱ्याच दिवशी सकाळी पाठवणीनंतर सासरवाडीत पोहोचलेल्या नवरीने नवरदेवाच्या कानशिलात लगावल्याने एकच चर्चा सुरू झाली.

लग्नसमारंभादरम्यान जौनपूरमध्ये विचित्र घटना घडण्याची अनेक प्रकरणे समोर येत असतात. दहा दिवस आधीच एका लग्नसमारंभात वरमाळा घालतानाच नवरदेवाकडील एक युवक स्टेजवर चढू लागला. मात्र, नवरीकडच्या लोकांनी नकार दिल्याने दोन्हीकडील लोकांमध्ये मारहाण सुरू झाली.

ताज्या बातम्या

धक्कादायक! पत्नीच्या ‘या’ मागणीला कंटाळून वनरक्षकाने वडाच्या झाडाला गळफास लावून केली आत्महत्या

त्याने माझ्यासोबत बळजबरीने सेक्स केला, मी प्रेग्नंट राहता राहता वाचले,’तारक मेहता’ मधील अभिनेत्रीने केला खुलासा..

काय सांगता! विजयने ‘या’ चित्रपटासाठी घेतले १०० कोटी रुपये मानधन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.