अरे बाप रे! काळा चष्मा लावणं नवरदेवाला पडलं महागात; नवरीने मंडपातच मोडलं लग्न

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात लग्न हे अविस्मरणीय क्षण असतो. पण अनेकदा काही लग्न वादविवादांमुळे मंडपातच मोडून जातात. अशात काही महिन्यांपुर्वी एका तरुणीने नवरदेवाला दोनचा पाढा येत नाही, असे म्हणत लग्न मोडले होते.

आता अशाच एका भलत्याच कारणामुळे लग्न मोडल्याचे समोर आले आहे. एका नवरीने नवरदेवाला पेपर वाचता आला नाही, म्हणून भरमंडपात लग्नाला नकार देत लग्न मोडले आहे. ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे.

लग्नामध्ये नवरदेवाने काळा चष्मा घालून आला होता, पण त्याने खुप वेळ झाला चष्माच काढला नाही. त्यामुळे नवरीने त्याला दिसते की नाही, हे बघण्यासाठी पेपर वाचायला लावला. पण त्याला चष्माशिवाय पेपरच वाचता नाही आला, त्यामुळे नवरीने लगेच लग्न मोडले आहे.

औरेयामध्ये राहणाऱ्या अर्जून सिंह यांनी त्यांची मुलगी अर्चनाचे लग्न शिवम नावाच्या मुलाशी ठरवले होते. ही एक अरेंज मॅरेज होती. नवरदेवाच्या कुटुंबाने सांगितले होते, की शिवम खुप शिकलेला आहे. शिकलेल्या असलेल्यामुळे मुलीच्या कुटुंबाने लग्नास होकार दिला.

लग्नाच्या दिवशी नवरदेव काळा चष्मा घालून मंडपात आला. सर्व विधी सुरु झाल्या, पण नवरदेवाने काही चष्मा काढला नाही. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. ही गोष्ट नवरीपर्यंत पोहचली. तिने लगेच नवरदेवाला चष्मा काढून हिंदी पेपर वाचण्यास दिला आणि पेपर वाचता आला तरच लग्न होईल, अशी अट ठेवली.

नवरदेवाने पेपर हातात घेतला, पण चष्मा शिवाय त्याला वाचता आले नाही. त्यामुळे नवरीने लगेच हे लग्न मोडले. आता या प्रकरणी नवरीच्या कुटुंबाने स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पेपर वाचता न आल्यामुळे तिने लग्न मोडल्यामुळे या लग्नाची सगळीकडेच चर्चा सुरु आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

कॅन्सरग्रस्त नट्टू काकांनी सांगितले त्यांचे सलमान, ऐश्वर्यासोबतचे नाते, म्हणाले, सलमान आणि एश्वर्या..
टू व्हिलर घेत असाच तर १ जुलैच्या अगोदर करा खरेदी, किमतीत होणार आहे मोठी वाढ, जाणून घ्या..
करिश्मा कपूरचा चित्रपट पाहील्यामूळे तिच्या चाहत्याला मिळाली होती शिक्षा; रात्रभर बाहेर झोपावे लागले

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.