इंटरनेटवर अनेकदा लग्नाचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही वेळा लग्नाचे हे व्हिडिओ खूप विनोदीही देखील असतात. व्हिडिओ जर वधू-वराशी संबंधित असेल तर लोक(People) मोठ्या उत्साहाने व्हिडिओ पाहतात. काही व्हिडिओंमध्ये लग्नाचा गोंधळ दाखवलेला असतो. तर काही व्हिडिओंमध्ये वधू-वर नाचत असल्याचे दाखवण्यात येतात.(bride funny viral video on social media)
असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ एका लग्नातील आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेव दारू पिऊन स्टेजवर येतो. हा नवरदेव इतका दारू पिऊन आलेला असतो की तो वधूऐवजी आपल्या सासूलाच हार घालू लागतो. यावेळी इतर लोक त्याला अडवण्याचा प्रयत्न करतात.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ काही युझर्सनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, वधू आणि वर दोघेही लग्नाच्या मंचावर उभे आहेत. लग्नाच्या मंचावर हार घालण्याचा कार्यक्रम सुरु आहे. वराने हातामध्ये हार घेतला आहे. वधूने देखील हातात हार घेतला आहे.
यावेळी मंचावरील इतर लोक वराला वधूच्या गळ्यात हार घालण्यास सांगतात. त्यानंतर वर होकार देत मान हलवतो आणि हार घालण्याचा प्रयत्न करतो. यावेळी नशेत असलेला वर वधूऐवजी आपल्या सासूलाच हार घालू लागतो. हे पाहून शेजारी उभे असलेले लोक त्याला अडवत असल्याचे व्हिडिओ मधून दिसून येत आहे.
यानंतर मंचावरील लोक वराला पुन्हा वधूला हार घालण्यास सांगतात. पण वर इतका नशेत होता की त्याला स्वतःला सांभाळता देखील आले नाही. वधूला हार घालता घालता तो सोफ्यावर पडतो. हे पाहून नववधूही आश्चर्यचकित होत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.
या व्हिडिओवर लोकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. एका युझरने कमेंट करत म्हंटले आहे की, ‘या नवरेदवाला सांभाळा.” दुसऱ्या एक युझरने म्हंटले आहे की, “हा मी पाहिलेला सर्वात विनोदी व्हिडिओ आहे. नवरदेवाला स्वतःचा तोल देखील सांभाळता येत नाही.” या व्हिडिओला हजारो लाइक्स मिळाले आहेत. हा विनोदी व्हिडिओ लोकांना फार आवडत आहे.
महत्वाच्या बातम्या :-
चीनने आक्रमक केल्यास रशिया मदत करेल याची अपेक्षा ठेऊ नका कारण.., अमेरिकेचा भारताला सूचक इशारा
अमिताभ नाही तर या सुपरस्टारचा दिवाना आहे रशिया, एका दिवसात विकली होती २० कोटी तिकीटं
कॉंग्रेसचं नाराजीनाट्य थांबेना! आणखी एका आमदाराने व्यक्त केली नाराजी, उचलणार ‘हे’ मोठे पाऊल..