लग्न झाल्या झाल्या नवरीने नवऱ्यासाठी केला भन्नाट डान्स, पाहून तुम्हालाही कौतुक वाटेल

लग्नात नवरा-नवरीचा डान्स हा विषय काही नवीन राहिलेला नाही. आजकाल अनेक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होताना पाहायला मिळतात. तसेच प्रेक्षकही असे व्हिडिओ पाहायला उत्सुक असतात. आज आपण असाच एक व्हिडिओ पाहणार आहोत.

हा व्हिडियो आहे हितीन आणि सुनैना यांच्या लग्नातला वायरल झालेला व्हिडियो. हा व्हिडियो पाहून तुमचे पाय थिरकायला लागले नाहीत असं होणार नाही. अनेक चाहत्यांनी या व्हिडिओचे कौतुक केले आहे. तसेच वेगवेगळ्या कमेंट आपल्याला पाहायला मिळतील.

जवळपास तीन वर्षांपूर्वी हे जोडपं लग्नबंधनात अडकलं. त्यावेळी एक पहेली लीला या चित्रपटातील ‘मेरे सय्यां सुपरस्टार’ हे गाणं अतिशय लोकप्रिय झालं होतं. हेच गाण सुनैना यांनी डान्स करण्यासाठी निवडलं.

या दोघांच्या लग्नात हे गाणं वाजायला सुरुवात झाली आणि सुनैना यांनी त्यावर डान्स करायला सुरुवात केली. अगदी मस्त डान्स स्टेप्स करत गाण्याचा आनंद घेताना सुनैना आपल्याला दिसतात. सोबत हितीन ही होतेच. सुनैना यांना आनंदित झालेलं पाहून हितीन सुद्धा खुश होते.

डान्समध्ये एक क्षण असा येतो जेव्हा सुनैना स्वतः हितीन यांना डान्स करण्यासाठी ओढतात. मग हितीन ही त्यांच्या पत्नीला सुयोग्य साथ देतात. आजूबाजूला असलेले नातेवाईक आणि मित्रपरिवार ही या जोडीकडे अगदी आनंदाने आणि कौतुकाने बघत असतात.

आज हा व्हिडियो अपलोड होऊन जवळपास दोन वर्षे झाली आहेत पण त्यातील गंमत अजूनही ताजीतवानी आहे. हा व्हिडियो हितीन आणि सुनैना यांनी स्वतःच्याच युट्युब चॅनेल वरून अपलोड केलेला होता. या चॅनलला सवा लाखाहून अधिक सबस्क्रायबर्स लाभले आहेत. चाहत्यांनी या जोडीला भरभरून प्रेम दिले आहे.

तसेच या व्हिडियोला जवळपास ५.८ करोड लोकांनी पाहिलं आहे आणि २.८५ लक्षाच्या आसपास लाईक्स या व्हिडिओला मिळाले आहे. तसेच या जोडीने कमेंट करून चाहत्यांचे आभार मानलेले पाहायला मिळते.

हे ही वाचा-

देवमाणूस मालिकेमधील एसीपी दिव्या सिंग घेणार प्रेक्षकांचा निरोप, देवी सिंगला फाशी कोण देणार?

नगरचा हा शेतकरी एका एकरात कमवतोय १५ लाख, फक्त फोन घ्यायला आहेत ४ कर्मचारी, जाणून घ्या..

लहान असताना आईबरोबर बांगड्या विकायचा; आज आहे आयएएस अधिकारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.