लग्नाच्या दिवशी पार्लरमध्ये नवरी मेकअप करत असताना एक मेसेज आला अन् ती ढसाढसा रडू लागली

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याचे लग्न हे अविस्मरणीय क्षण असतो. या क्षणाची प्रत्येक जण आतूरतेने वाट पाहत असतो. पण आता अशाच एका तरुणीच्या लग्नादिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशातील एका तरुणीचे लग्न ठरलेले होते. लग्नाच्या दिवशी तिचा ब्युटीपार्लरमध्ये मेकअप सुरु होता, पण अचानक रद्द झालेल्या लग्नामुळे तिच्या पायाखालची जमिनीच सरकली आहे.

नवरीमुलगी सकाळपासून आपल्या लग्नाची तयारी करत होती. त्यासाठी ती ब्युटी पार्लरमध्ये गेली होती. पण त्याचवेळी तिच्या मोबाईलवर एक मॅसेज आला. तो मॅसेज होता होता नवरदेवाचा. त्याने असे म्हटले होते, की लग्न रद्द झाले आहे. आम्ही वरात घेऊन येणार नाही, हा मॅसेज पाहून तिला धक्काच बसला.

मुलीने याबाबत कुटुंबातील लोकांना माहिती दिली आहे. त्यानंतर मुलीने नवरदेवाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. कानपुरमध्ये राहणाऱ्या पुष्पलता हिचे लग्न महाराजपुरच्या क्रांती सिंग सोबत ठरलेले होते.

२८ एप्रिलला हे लग्न होणार होते, वरात येणार म्हणून नवरीच्या घरी तयारी सुरु होती. तर मुलगी ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करत होती. तितक्यात मोबाईलवर मॅसेज आला तो नवरदेवाचा होता. त्यात असे लिहिले होते की आता वरात घेऊन येणार नाही.

नवरीला हा मॅसेज वाचून धक्का बसला होता. त्यानंतर तिने याबाबत कुटुंबाला सांगितले. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता, हुंडा न मिळाल्यामुळे नवरदेवाने लग्न रद्द केले होते.

त्यानंतर पुष्पलताने हे लग्न कधीच होणार नाही, असे म्हटले आहे. तसेच लग्नासाठी ३० लाखांचे कर्ज घेतले आहे. १२ लाखांची गाडी घेतली आहे, तरी त्यांचा हुंड्याचा लोभ संपत नसेल, तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, असे त्या तरुणीने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील श्वेताचा खेळ खल्लास; अखेर सत्याचाच होणार विजय
नवरा म्हणाला मी ४००० महिलांसोबत झोपलोय, मग ७७ वर्षाच्या पतीला २५ वर्षाच्या पत्नीनेच टाकले मारुन
लष्करातील मेजर ते प्रसिद्ध अभिनेते असा झंझावाती प्रवास करणारे विक्रमजीत कंवरपालांचे कोरोनाने निधन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.