हार घालताना नवरीची ही छोटीशी मागणी पुर्ण करु शकला नाही नवरदेव; नवरीने लग्नालाच दिला नकार

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याचे लग्न हे अविस्मरणीय क्षण असतो. पण अनेकदा काही लग्न वादविवादांमुळे मंडपातच मोडून जातात. अशात आता उत्तर प्रदेशात एक अजबंच कारणामुळे लग्न मोडल्याचे दिसून आले आहे.

लग्न मंडपात लग्न सुरु असतानाच एका नवरीने आपल्या होणाऱ्या नवऱ्याची परिक्षा घेण्याचे ठरवले आणि त्याला दोनचा पाढा म्हणण्यास सांगितला. मात्र परिक्षेत होणारा नवरा फेल झाल्याने त्या नवरीने त्या नवऱ्याची थेट हकालपट्टी केली आहे.

उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. शनिवारी या जिल्ह्यातील एका गावात एक लग्न पार पडणार होते. त्यासाठी संध्याकाळी नवरेदेव वरात घेऊन आला होता. मात्र त्याआधीच नवरीला माहिती मिळाली होती, की नवरदेव तितका शिकलेला नाही. जितके त्या नवरदेवाने नवरीच्या कुटुंबाला सांगितले होते.

त्यामुळे नवरीने त्या नवरदेवाची परिक्षा घेण्याचे ठरवले. जेव्हा वरमाला घालण्याची वेळ आली, तेव्हा नवरदेवाला चक्क दोनचा पाढा म्हणायला लावला. नवरीची अशी मागणी पाहून नवरदेवाला आश्चर्याचा धक्काच बसला.

नवरीच्या या मागणीवर त्याने दुर्लक्ष केले, पण नंतर नवरीने पुन्हा ओरडून दोनचा पाढा म्हणायला लावला. तेव्हा मात्र नवरदेव पुरता फसला खुप प्रयत्न केले मात्र नवरदेवाला पाढा म्हणता आला नाही. त्यानंतर नवरीने भरमंडपात लग्न करण्यास नकार दिला आहे.

नवरदेवाच्या घरच्यांनी नवरीच्या कुटुंबाला त्याच्या शिक्षणाबाबत चुकीची माहिती दिली होती. ही बाब नवरीला कुठून तरी कळाली त्यामुळे तिने त्याची परिक्षा घेण्याचा निर्णय घेतला. अशात परीक्षेत फेल झाल्यामुळे नवरीने जाग्यावरच नवरदेवाला लग्नासाठी नकार दिला आहे.

मी अशा मुलाशी लग्न करु शकत नाही, ज्या मुलाला गणिताचे साधे ज्ञान पण नाही.कदाचित तो शाळेतही गेला नसावा, असे म्हणत तिने हे लग्न मोडले आहे. यावेळी तिच्या घरच्यांनी तिला समजवण्याचा खुप प्रयत्न केला होता, पण ती आपल्या निर्णयावर ठामा राहिली आणि लग्न मोडले.

महत्वाच्या बातम्या-

वडिल शिवणकाम करायचे, तो पेपर टाकायचा, पुस्तके घ्यायलाही पैसे नव्हते तरीही तो झाला अधिकारी
निलेश लंके: एकेकाळी आमदाराच्या वशील्याने काम मिळवण्यासाठी फिरत होता, आज आहे आमदार
महिलांच्या शरीरयष्टीतील ‘या’ तीन गोष्टींवरून तुम्ही ओळखू शकता त्यांचा स्वभाव; जाणून घ्या कसा…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.