लग्ना अगोदरच झाले प्रभासचे ब्रेकअप; कारण ऐकून धक्का बसेल

साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार प्रभासला आज सगळे जग ओळखते. त्याचे जगभरात लाखो करोडो चाहते आहेत. सध्याच्या घडीला तो साऊथमधील सर्वात यशस्वी अभिनेता आहे. त्याने हे नाव कमवण्यासाठी अनेक वर्षे इंडस्ट्रीमध्ये मेहनत केली होती. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्याला हे यश मिळाले आहे.

प्रभास साऊथ इंडस्ट्रीतील एका मोठ्या कुटुंबातील मुलगा आहे. त्याच्या घरातील अनेक व्यक्ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. प्रभासने त्याच्या करिअरची सुरुवात केली त्यावेळी त्याला काय खास यश मिळाले नाही. पण काही काळानंतर त्याचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले.

२०१५ मध्ये रिलीज झालेल्या ‘बाहुबली’ चित्रपटाने तर त्याचे नशीब बदलून टाकले होते. तो रातोरात सुपरस्टार झाला होता. त्याच्यासोबतच चित्रपटामध्ये काम करणारा प्रत्येक व्यक्ती खुप प्रसिद्ध झाला होता. जगभरात या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता.

चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रभास आणि अनुष्का शेट्टीच्या अफेअरच्या चर्चा होत होत्या. दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात होते. पण त्या दोघांनी मात्र कधीही या गोष्टीवर स्पष्टीकरण दिले नाही. एवढेच नाही तर चित्रपटानंतर प्रभासला ५००० मुलींनी लग्नासाठी प्रोपोज केले होते. असे बोलले जात होते.

तरीही प्रभास आजही अविवाहित आहे. पण आज आम्ही तुम्हाला प्रभासच्या खऱ्या प्रेमाबद्दल सांगणार आहोत. प्राभास ज्या मुलीवर प्रेम करतो ती साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या अफेअरच्या बातम्या येत आहेत.

ही अभिनेत्री अनुष्का शेट्टी नसून निहारीका कोंडीनेला. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. पण त्या दोघांनी मात्र कधीही यावर प्रतिक्रिया दिली नाही.

निहारिकाचे संपूर्ण कुटुंब फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेले आहे. निहारीका मेगा स्टार चिरंजीवी आणि आणि अभिनेता कल्याणची भाची आहे. ती सुपरस्टार अल्लू अर्जून आणि राम चरनची बहीण आहे. दोघांच्या ती अतिशय लाडकी बहीण आहे. निहारीकाचे कुटुंब खुप प्रसिद्ध आहे.

तर दुसरीकडे प्रभासचे कुटुंब देखील खुप प्रसिद्ध आहे. म्हणून दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू होत्या. असे बोलले जात होते की, दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या कुटुंबांनी देखील लग्नाची तयारी केली होती. २०१९ मध्ये दोघांच्या लग्नाच्या बातम्या आल्या होत्या.

 

दोघांच्या जोडीला खुप पसंत केले जात होते. निहारिका दिसायला खूपच सुंदर आहे. पण दोघांचे लग्न होऊ शकले नाही. काही व्यक्तीक कारणामुळे दोघांचे ब्रेकअप झाले आणि लग्न मोडले. निहारीकाने २०२० मध्ये लग्न केले. तर प्रभास अजूनही अविवाहित आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.