“शिवसेना भवन फोडणं हे फडणवीसांचे पाय चेपण्याइतकं सोपं नाही”; प्रसाद लाड यांच्या विधानानंतर वातावरण तापलं

मुंबई। भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी शिवसेनेला वाटतं की आम्ही माहीममध्ये आल्यावर सेनाभवन फोडू तर त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही सेनाभवन पण फोडू असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात खळबळ सुरु झाली आहे. सत्ताधारी व विरोधक यांच्यात वेगवेगळ्या विषयावरून वाद निर्माण होत आहेत, अशातच प्रसाद लाड यांच्या या विधानामुळे आता संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

अशातच आता शिवसेना भवन फोडणं देवेंद्र फडणवीसांचे पाय चेपण्याइतकं सोपं नाही, असं म्हणत सेनाभवन फोडणाऱ्यांचं थोबाड फोडू असा इशारा शिवसेनेच्या एका आमदाराने दिला आहे. आमदार प्रसाद लाड यांच्या वक्तव्याने संतापलेले शिवसेना आमदार राजन साळवी यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे.

शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांचा या ट्विवमध्ये संताप स्पष्ट दिसत आहे. साळवी म्हणाले की, ‘शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांचं थोबाड फोडू,’ असं साळवी यांनी म्हटलं आहे. ‘शिवसेना भवन’ला हात लावणं म्हणजे देवेंद्र फडणवीसांचे पाय चेपण्याइतकं सोप्पं आहे असं काही भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे,’ अशी बोचरी टीकाही साळवी यांनी केली आहे.

शिवसेना भवन हे आम्हा शिवसैनिकांचे मंदीर आहे आणि यात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींचा सुगंध आहे. आमदार प्रसाद लाड हे शिवसेनेच्या मतांवर विधानपरिषद निवडणूक जिंकले आहेत. त्यांच्यावर शिवसेनेचे व शिवसेना भवनाचे उपकार आहेत. त्यांच्या तोंडी शिवसेना भवन फोडण्याची भाषा शोभत नाही.

प्रसाद लाड यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी विधानपरिषद आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवा. असं थेट राजन साळवी यांनी प्रसाद लाड यांना इशारा दिला आहे. त्यामुळे आता भाजपकडून काय उत्तर येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

शनिवारी भाजपच्या दादरच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार नितेश राणे आणि आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी प्रसाद लाड त्यांनी हे विधान केले होते. व या विधानानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
महत्वाच्या बातम्या
हृदयद्रावक! भगत सिंह यांची भूमिका साकारताना चिमुरड्याचा गळफास लागून तडफडून मृत्यू
आयुष्याची नव्याने सुरुवात करणार मंदिरा बेदी; पतीच्या निधनानंतर पोस्ट शेअर करत म्हणाली…
हेच खरे हिरो! बाळाला कडेला घेऊन कॉलेजमध्ये शिकवतो हा बाप, कारण ऐकून येईल डोळ्यात पाणी..
‘भुज’ चित्रपटातील नोराच्या ‘जालिमा कोका कोला’ गाण्याने सोशल मिडीयावर घातला धुमाकूळ; पहा व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.