Homeताज्या बातम्यामोठी बातमी! राज ठाकरेंना अटक होणार? कोर्टाने अटक वाॅरंट काढत दिले आदेश

मोठी बातमी! राज ठाकरेंना अटक होणार? कोर्टाने अटक वाॅरंट काढत दिले आदेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात आज बीडमधील परळी कोर्टाने अटक वॉरंट जारी केला आहे. जामीन करुनही राज ठाकरे सतत तारखांना गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला आहे. २००८ साली मनसे काही कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. या प्रकरणात बीडमधील परळी कोर्टात केस सुरु आहे.

रेल्वेत परप्रांतीयांचीच भरती केली जात असल्याबद्दल वक्तव्य केल्या प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना २००८ मध्ये अटक करण्यात आली होती. या अटकेचे पडसाद राज्यात अनेक ठिकाणी उमटले होते. अंबाजोगाईत मनसे सैनिकांनी एसटी बसेसवर दगडफेक करून महामंडळाचे नुकसान केले होते. या प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

अंबाजाेगाई शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राज ठाकरेंना जामीन मिळाल्यांनतर ते अंबाजोगाई न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे अंबाजोगाई न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले होते.

राज ठाकरे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. माने यांच्या न्यायालयासमोर हजर झाले असता तीनशे रुपये दंड घेऊन त्यांचे अटक वॉरंट रद्द करण्यात आले होते. सहा वर्षांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राच्या दुष्काळी दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी बीडमधील अंबाजोगाईत हजेरी लावली होती.

या प्रकरणी परळी न्यायालयाने राज ठाकरे यांना जामीन देखील मंजूर केला होता. पण न्यायालयीन सुनावणीला हजर न राहिल्यामुळे पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या :-
सिंधुताईंच्या पार्थिवावर अग्निसंस्कार करण्याऐवजी दफनविधी का करण्यात आला? जाणून घ्या कारण..
पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ढिसाळपणा सहण करणार नाही, काॅंग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांनी माफी मागावी
कतरिनाने विकीच्या नावाच्या मंगळसूत्राचा फोटो केला शेअर, लोकं म्हणाली हिंदू धर्म मनापासून स्विकारलास