येथे तोडल्या धर्माच्या भिंती! हिंदू महिलेवर मुस्लिम कार्यकर्त्यांनी केले अंत्यसंस्कार

सध्या कोरोना महामारीने देशाला त्रस्त करून सोडले आहे. कोरोनाच्या संकटकाळात बेड मिळणे कठीण झाले आहे. बेड्स प्रमाणे मरण पावलेल्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यात त्यांच्या नातेवाईकांना अडचण येत आहे.

कोरोनाच्या या संकटकाळात मृत्युमुखी पडणाऱ्या मृतदेहांचे अंतिम संस्कार पार पाडणं म्हणजे एक दिव्य काम झालं आहे. कोरोना मृतांच्या नातेवाईकांना आपल्या कुटुंबातील सदस्य समजून अनेक सामाजिक कार्यकर्ते आता पुढे येत आहेत. सांगली जिल्ह्यातील अशीच एक संघटना आता प्रकाशझोतात आली आहे.

मदनी चॅरिटेबल ट्रस्ट सांगली आणि जमियत उलेमा ए हिंद असं या संघटनांचे नाव आहे. या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या संकटात आपलं सामाजिक काम सुरूच ठेवलं आहे. जिथं कोरोनाने कुठल्याही जाती धर्माची व्यक्ती मरण पावल्यास दफनविधी, अत्यंविधी साठी सहसा लोक पुढं येत नाहीत.

नागज इथं एका महिलेचा कोरोना संक्रमणाने मृत्यू झाला. या महिलेला बेडसाठी वणवण भटकावे लागले होते. तिचा मृत्यू झाल्यानंतर गावातल्या लोकांनी मृतदेह गावात आणू नका तिकडेच कुठंतरी अंत्यसंस्कार करा असा निरोप दिला. आता अंत्यसंस्कार करण्याचे दिव्य होते. मृतांच्या नातेवाईकांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना संपर्क केला.

मदनी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष यांच्यासह कार्यकर्त्यांनी क्रीडासंकुल इथल्या कोविड सेंटरमध्ये जाऊन सदर महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर हिंदू पद्धतीने मिरजेतील पंढरपूर रस्त्यावर असलेल्या स्म्शान भूमीत अंत्यसंस्कार केले. आतापर्यंत दीडशेहून अधिक मृतदेहाचे दफन आणि नऊ मृतदेहांचे अंत्यसंस्कार दोन्ही संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहेत.

विशेष बाब म्हणजे आतापर्यंत एकही रुपयांचा मोबदला न घेता सगळे अंत्यसंकर आणि दफनविधी करण्यात आलेले आहेत. दोन्ही संघटनांनी सामाजिक ऐक्य अजूनही जिवंत असल्याचे दाखवत प्रत्यक्षात काम केलेले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.