Share

Swedish Company News : ताण कमी करण्याचा नवा फंडा! हस्तमैथुनासाठी ऑफिसमध्येच ब्रेक? ‘या’ कंपनीनं असा निर्णय का घेतला

Swedish Company News :  कामाच्या ठिकाणी ताण-तणाव कमी करण्यासाठी कंपन्या साधारणपणे मनोरंजनाचे उपक्रम, फिटनेस प्रोग्राम किंवा ध्यान-योगा सत्र आयोजित करतात. पण स्वीडनमधील एरिका लस्ट फिल्म्स (Erika Lust Films) या प्रौढ चित्रपट निर्मिती कंपनीने कर्मचाऱ्यांना ताणमुक्त करण्यासाठी एक वेगळाच प्रयोग राबवला आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दररोज 30 मिनिटांचा “हस्तमैथुन ब्रेक” देण्याचा निर्णय घेतला आहे, आणि त्यासाठी ऑफिसमध्ये स्वतंत्र खास खोली देखील उपलब्ध करून दिली आहे.

कोव्हिडनंतर तणाव वाढला

कंपनीच्या मालकीण एरिका लस्ट (Erika Lust) यांच्या मते, 2021 मध्ये कोविड-19 महामारीच्या काळात दीर्घकाळ घरून काम (वर्क फ्रॉम होम) केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये ताण, चिडचिड आणि एकाग्रतेचा अभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत होता. अनेक जण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ दिसत होते. या पार्श्वभूमीवर मे 2022 मध्ये कंपनीने 30 मिनिटांच्या “मास्टरबेशन ब्रेक”ला आपल्या अधिकृत धोरणाचा भाग बनवले.

ऑफिसमध्ये ‘हस्तमैथुन स्टेशन’

या उपक्रमासाठी कंपनीने ऑफिसमध्ये एक खास रूम तयार केली, ज्याला “हस्तमैथुन स्टेशन” असे नाव दिले. येथे कर्मचारी ब्रेकदरम्यान जाऊन तणावमुक्त होऊ शकतात. कंपनीने याच काळात ‘हस्तमैथुन महिना’ देखील साजरा केला. या उपक्रमाचा उद्देश केवळ लैंगिक आनंद देणे नसून, सर्जनशीलता वाढवणे, लक्ष केंद्रित करणे आणि मानसिक आरोग्य सुधारण्यावर होता, असे एरिकाचे म्हणणे आहे.

एका ब्लॉग पोस्टमध्ये एरिकाने म्हटले आहे, “हस्तमैथुनामुळे आनंदाची आणि आरामाची भावना वाढते, एकाग्रता सुधारते आणि सर्जनशीलतेला चालना मिळते. त्यामुळे हे केवळ वैयक्तिक आरोग्यासाठीच नाही तर कार्यक्षमतेसाठीही फायदेशीर आहे.”

सेक्स टॉय ब्रँडसोबत भागीदारी

2022 मध्ये कंपनीने जर्मनीतील फन फॅक्टरी (Fun Factory) या सेक्स टॉय ब्रँडसोबत भागीदारी केली आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीचे सेक्स टॉय मोफत देण्याची योजना आखली. Chemist4U च्या सर्वेक्षणानुसार, 14% लोकांनी कामाच्या वेळेत कधीतरी हस्तमैथुन केल्याचे मान्य केले आहे.

एरिकाच्या या निर्णयाने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. काही जणांनी या उपक्रमाचे स्वागत केले, कारण तो कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, असे मत व्यक्त केले. तर काहींनी यावर टीका करत, हे कार्यस्थळासाठी अयोग्य असल्याचे म्हटले. तरीदेखील, या निर्णयामुळे ‘दिवसातून एकदा हस्तमैथुन, डॉक्टरांपासून दूर राहा’ हे कंपनीचे नवे घोषवाक्य लोकप्रिय होत आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now