ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी संजिवनी आणणाऱ्या हनुमानाचा फोटो ट्वीट करत भारताचे मानले आभार

भारताने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्यानंतर ब्राझीलने लसीची मागणी केली होती. भारताकडून लसींचे डोस पाठवण्यात आल्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैयर बोल्सनारो यांनी भारताचे कौतूक करत हनुमान संजीवनी घेऊन जातानाचा फोटो ट्विट केला आहे.

जैयर बोल्सनारो यांनी भारताच्या या योगदानामुळे कौतूक केले आहे. तसेच त्यांनी थेट हनुमान संजीवनी नेतानाचा फोटो ट्विट केला आहे. जैयर एम बोल्सनारो यांनी यासंबंधी शुक्रवारी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, “नमस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदी. या साथीच्या काळात तुमच्यासारखा चांगला साथीदार मिळाल्यामुळे ब्राझीलला हा सन्मान वाटत आहे.”

“कोरोना लस भारतातून ब्राझीलमध्ये आणल्याबद्दल धन्यवाद. असं त्यांनी ट्विटमध्ये लिहित हिंदीमध्ये धन्यवाद असेही लिहिले आहे. सोबत संजीवनी बुटी घेऊन जाणाऱ्या हनुमानाचा फोटोही ट्विट केला आहे.

इतर देशांमध्ये लस पाठविण्याच्या भारताच्या निर्णयाचे अमेरिकेने कौतुक केले आहे. सर्वाधिक कोरोना मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या बाबतीत ब्राझिल जगात दुसऱ्या स्थानावर आहे. यापैकी २ लाख १४ हजार २२८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

याला म्हणतात प्रेमभंगी! पठ्याने ‘दिल टुटा आशिक’ नावाने सुरू केला कॅफे

तेव्ह महात्मा गांधीनाही पत्कारावी लागली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासमोर हार

शेतकरी नेत्यांच्या हत्येच्या कटाची कबूली देणाऱ्या आरोपीचा यू-टर्न; म्हणाला…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.