Share

कर्कश हॉर्न, डीजेवर ठेका, नागीण डान्स; रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी दिला चोप

काही दिवसांपूर्वी काही तरुणांचा ट्रकच्या हॉर्नवर डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये १०-१५ तरुण चक्क ट्रकच्या हॉर्नवर ठेका धरताना पाहायला मिळाले होते. असाच काहीसा प्रकार करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी चोप दिल्याचे समोर आले आहे. भीमाशंकरमध्ये हा प्रकार घडला आहे.(Boys dancing on street police beat)

भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर काही तरुण कर्कश हॉर्न वाजवतात. तसेच मोठ्या आवाजात डीजे लावून नाचतात. गेल्या काही दिवसांपासून अशा तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने पावले उचलत हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी या तरुणांना लोकांसमोरच चोप दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही तरुण डीजे लावून नाचत होती. यामुळे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. हा सर्व प्रकार पाहून उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील आणि पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी हुल्लडबाजी करणाऱ्या या तरुणांना लोकांसमोरच चोप दिला.

पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील म्हणाले की, “रस्त्याने गाडीतील साउंड सिस्टीमचा आवाज वाढवून नाचणाऱ्या तरुणांचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले होते. तरुणांचे हुल्लडबाजी करत नाचतनाचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. अशा प्रकारांमुळे धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखले जात नाही”, असे पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी सांगितले.

पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील पुढे म्हणाले की, “रस्त्याने जाणाऱ्या लोकांचा या हुल्लडबाजीचा त्रास होतो. यामधून शांतता भंग होते. तसेच यातून वादावादी होऊन काही अनुचित प्रकार देखील घडतात. यासाठी असे कृत्य कोणीही करू नये. असे कृत्य करताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल”, असे पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :-
मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ शब्द आठवताच दीपक केसरकरांना अश्रु अनावर; वाचा नेमकं काय घडलं?
राणेंची मुलं लहान आहेत, त्यांना फडणवीस साहेब समजवतील; दीपक केसरकरांचा राणे पुत्रांना टोला
‘ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे कुठून शिकलात’, जितेंद्र आव्हाड केसरकरांवर संतापले

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now