Share

प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर अख्या गावाचीच लाइट घालवायचा; गावकऱ्यांना समजताच…

प्रेमाचे अनेक किस्से आपल्याला ऐकायला येत असतात. पण आज आम्ही तुम्हाला एका प्रियकराचा भन्नाट किस्सा सांगणार आहोत. बिहारमधील एका गावातील प्रियकर(Boyfriend) आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी दररोज संपूर्ण गावातील लाईट बंद करायचा. हा प्रकार गावकऱ्यांना समजला आणि त्यांनी प्रियकराला पकडण्याचा कट रचला.(boyfriend switch off lights of village to meet girlfriend)

या घटनेची सध्या संपूर्ण देशात खूप चर्चा होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील गणेशपूर गावातील एका इलेक्ट्रिशियनने आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी भन्नाट योजना आखली. हा इलेक्ट्रिशियन आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी रात्री संपूर्ण गावातील लाईट बंद करायचा. गावकऱ्यांना सुरवातीला हि एक सामान्य गोष्ट वाटली. त्यांना इलेक्ट्रिशियनच्या लाइट घालवण्याच्या कल्पनेबद्दल काही माहिती नव्हती.

बरेच दिवस हा प्रकार चालू होता. एकेदिवशी गावकऱ्यांना आजूबाजूच्या गावात रात्री लाईट असल्याची माहिती मिळाली. आजूबाजूच्या गावात रात्री लाईट आहे, पण आपल्याच गावात रात्री दोन-तीन तास लाईट बंद का असते? हा प्रश्न गणेशपूर गावातील नागरिकांना पडला. त्यानंतर गावकऱ्यांनी यासंदर्भातील तपासाला सुरवात केली.

काही दिवसांनंतर गावकऱ्यांना या गोष्टीची माहिती मिळाली. त्यानंतर गावकऱ्यांनी इलेक्ट्रिशियन प्रियकराला रंगेहाथ पकडण्याचा कट रचला. एके दिवशी प्रियकराने गावातील लाईट बंद केली आणि प्रेयसीला भेटायला गेला. त्यानंतर गावकऱ्यांनी इलेक्ट्रिशियनचा शोध सुरु केला. काही वेळाने गावकऱ्यांना तो प्रेयसीसोबत सापडला.

त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी प्रियकराचे मुंडण केले आहे. तसेच गावकऱ्यांनी प्रियकराची गावातून धिंड काढली आहे. त्यानंतर गणेशपूर गावातील नागरिकांनी प्रियकराचे त्याच मुलीशी लग्न लावून दिले आहे. या घटनेची सध्या संपूर्ण बिहार राज्यात चर्चा होत आहे.

स्थानिक पोलिस स्टेशनचे प्रभारी विकास कुमार आझाद यांनी या सर्व घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, “या प्रकरणात अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.” एका गावकऱ्याने माहिती देताना सांगितले की, “वीजपुरवठा खंडित झाल्याने आपण अस्वस्थ होतो. उन्हाळ्याच्या दिवसातही संध्याकाळी तीन-चार तास दिवे बंद असायचे. इलेक्ट्रिशियन प्रेयसीला भेटण्यासाठी रात्री दिवे बंद करायचा.”

महत्वाच्या बातम्या :-
“तुम्ही मला फक्त वज्रमूठ द्या…दात पडायचं काम मी करून दाखवतो”, टीझरमधून मुख्यमंत्र्यांचे शिवसैनिकांना आवाहन
‘मी रेकॉर्डींग रूममध्ये गेले, तेव्हा…,’ ‘अहो शेठ लय दिसान झालीया भेट’ सोनाली सोनावणेनी सांगितला किस्सा
“दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीत एकी नाही”, प्रसाद ओकने व्यक्त केली खंत

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now