मुंबईचा हा पठ्या एक दिवसासाठी बनतो भाड्याचा बॉयफ्रेंड, आतापर्यंत एवढ्या मुलींना केलंय डेट

१४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे जवळ आला आहे. या दिवशी मुलं आणि मुली आपल्या मनातील गोष्टी आपल्या आवडत्या व्यक्तीला सांगतात. १४ फेब्रुवारीची तयारी तरूणांनी आणि तरूणींनी आतापासूनच सुरू केली आहे.

तसे बघायचे झाले तर ७ ते १४ फेब्रुवारी दरम्यान अनेक डेज असतात. जसे की प्रोपोज डे, चॉकलेट डे इत्यादी. वेलेंटाईन डे च्या दिवशी अनेक नवीन नाती तयार होतात. जे तरूण आधीपासूनच प्रेमात असतात ते तरूण आपल्या बंधनाला अजून घट्ट करतात.

ज्यांच्या जीवनात कोणीच लाईफ पार्टनर नाही त्यांच्यासाठी व्हॅलेंटाईन डे म्हणजे एका भयानक स्वप्नासारखा आहे. पण एक असा व्यक्ती आहे जो हे स्वप्न चांगले बनविण्याचा प्रयत्न करत आहे.

हा व्यक्ती मागील तीन वर्षांपासून व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी भाड्याचा बॉयफ्रेंड बनण्याचे काम करत आहे. या तरूणाचे नाव आहे शकुल. ह्युमन्स ऑफ बॉम्बेच्या वेबसाईटवर त्याने लिहिले आहे की माझ्या आयुष्यात कधीच कोणती गर्लफ्रेंड नाही आली.

मला फक्त एकदा कोणालातरी हा म्हणायचे आहे. जेव्हा माझे मित्र डेटवर जायचे तेव्हा मला खुप दु:ख व्हायचे. त्यानंतर मी एकटाच निघुन जायचो. पण आता सगळे बदलले आहे. शकुल म्हणाला की, व्हॅलेंटाईन डे ने मला शिकवले की मी गर्लफ्रेंड पटवण्यात किती कमजोर आहे.

जेव्हा कपल्स एकमेकांना प्रपोज करतात ते बघून मला दु:ख होते. मी अनेक मुलींना प्रपोज केले पण त्या मला फक्त दोस्त म्हणून माझा प्रस्ताव नामंजुर करायच्या. त्यानंतर मी त्या मुलींचा विचार करायला लागलो ज्या मुली व्हेलेंटाईन डे च्या दिवशी एकट्या असतात.

त्या मुलींना बॉयफ्रेंड नसतो किंवा त्यांचा ब्रेकअप झालेला असतो. शकुल मागील तीन वर्षांपासून भाड्याचे बॉयफ्रेंड बनण्याचे काम करत आहे. त्याने सांगितले की मागील तीन वर्षांत त्याने ४५ मुलींना डेट केले आहे.

त्याचे म्हणणे आहे की, जेव्हा एक एकटा माणूस दुसऱ्या एकट्या माणसाला भेटतो तेव्हा त्या दोघांचा एकटेपणा दूर होतो. त्याच्या या प्रयत्नाने दोघांनाही आनंद मिळतो मग जरी हा आनंद काही वेळाचा का असेना.

त्याला एका पार्टनरची गरज अजूनही भासते पण आधी जेवढे दु:ख व्हायचे तेवढे दु:ख आता त्याला होत नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा आणि जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा.

महत्वाच्या बातम्या
..त्यामुळे “मला भारतरत्न देण्याच्या मागणीची मोहीम थांबवा’’ रतन टाटांचे भावनिक अवाहन
राष्ट्रीय पुरस्कार मिळत नसल्याने गायक कुमार सानुंनी व्यक्त केली खंत, म्हणाले…
वाचा पॉर्न इंडस्ट्रीचे काळे सत्य; अभिनेत्रींनी इंडस्ट्री सोडली तरी का होते जगणे कठीण, मिया खलिफाने केले सत्य उघड
रणविर शौरीनं गाण्यातून साधला रिहानावर निशाणा; ‘रिहाना तो बहाना है..पप्पू को PM बनाना है’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.