धक्कादायक! वडिलांच्या पिस्तुलाने गोळी झाडून भाजपच्या नगरसेविकेच्या मुलाची आत्महत्या

पुणे | पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपच्या नगरसेविका करूणा चिंचवडे यांचा मुलगा प्रसन्ना चिंचवडे याने आत्महत्या केली आहे. त्याने स्वताला गोळी झाडून घेतल्याचे वृत्त समोर आले आहे.

या घटनेमुळे पुर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली. होळीच्या निमित्ताने सर्व कुटुंबिय घरीच होते. प्रसन्न आपल्या खोलीत बसला होता. काही वेळाने त्याच्या रूममधून गोळी झाडाण्याचा आवाज आला.

घरात गोळी झाडण्याचा आवाज आल्याने एकच खळबळ माजली. घरातील सगळे लोक प्रसन्नच्या खोळीकडे पळाले. प्रसन्नच्या खोलीत जेव्हा ते पोहोचले तेव्हा त्याचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेला होता. यानंतर या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रसन्नने ज्या बंदुकीने गोळी झाडून घेतली होती ती त्याच्या वडिलांचीच होती. त्यामुळे ही आत्महत्याच असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. प्रसन्नला तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी त्याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला होता.

त्यानंतर रविवारी रात्रीच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे पुर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत की, प्रसन्नने आत्महत्या का केली? आत्महत्या करण्याच्या आगोदर तो कोणाशी बोलत होता? त्याला कोणाचे फोन आले होते? याचा तपास पोलिस करत आहेत.

महत्वाच्या बातम्या
अंकिता लोखंडेने सांगितला कास्टिंग काऊचचा अनूभव; म्हणाली, रूममध्ये नेऊन…
निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केला धक्कादायक दावा; म्हणाल्या…
आपला संसार अपूर्ण राहीला, पुढच्या जन्मी नव्याने सुरवात करू; माझी हार्डडिस्क फुटत आहे मला माफ कर
निवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केला धक्कादायक दावा; म्हणाल्या…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.