उकळत्या पाण्यात ध्यान लावून बसला चिमुकला; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात, पण काही व्हिडिओ दिवसभराचा चर्चेचा विषय बनून राहतात. सोशळ मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडिओ हे खरंच आश्चर्याचा धक्का देणारे असतात. आता हैराण करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका लहान मुलाचा हा व्हिडिओ अतिशय धक्कादायक आहे. त्या मुलाला बघून नेटकरीही हैराण झाले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, एक मुलगा समाधी मुद्रामध्ये गरम कढईत बसलेला दिसत आहे, जे अंगावर काटा आणणारे आहे.

अशात या व्हिडिओसंदर्भात सोशल मीडियावर वादही सुरू झाला आहे. काही लोक त्याला बनावट म्हणत आहेत. अवघ्या २३ सेकंदांचा हा हैराण करणारा व्हिडिओ सुमारे २० लाखांपेक्षा जास्त वेळा बघितला गेला आहे. पण व्हिडिओमध्ये जे काही दिसत आहे ते भयानक आहे.

व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर iSandeepBisht नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केली गेली आहे. या पोस्टला २८०० पेक्षा जास्त लोकांनी रीट्वीट केले आहे, तर नऊ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. मुलाचा व्हिडिओ शेअर करताना संदीप बिष्टने कॅप्शनमध्ये लिहिले की हा २०२१ चा भारत आहे.

व्हिडिओमध्ये एक मूल उकळत्या पाण्याच्या कढईत बसलेले दिसत आहे. कढईच्या तळाला आग दिसत आहे. त्याचवेळी त्याच्या आजूबाजूला लोकांची गर्दी जमा होते. प्रत्येकजण मुलाकडे पाहत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणीही मुलाला काढण्याचा प्रयत्न केला नाही. व्हिडिओमध्ये, मूल उकळत्या पाण्यात हात जोडून आरामात बसले आहे. जणू काही तो मंत्राचा जप करत आहे.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की कढईतील पाणी वेगाने उकळत आहे. आजूबाजूला पाण्यात फुले आहेत. पण मुलावर उकळत्या पाण्याचा अजिबात परिणाम होत नाही. त्याचवेळी लोक त्याच्याकडे आश्चर्याने बघत आहे.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काहींनी संदीपने कॅप्शनमध्ये लिहिलेल्या २०२१ चा भारतमुळे आक्षेप घेतला, तर काहीजण हा व्हिडिओ बनावट असल्याचे सांगत आहेत. काही लोकांनी तर या व्हिडिओचे सत्य जाणून घेण्यासही सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! भाजप नेत्याच्या पत्नीवर माकडांचा हल्ला; हल्ल्यात पत्नीचा दुसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू
ऑलिंपिक पदक जिंकल्यानंतर १० पटीने महागडे झाले हे खेळाडू, या ब्रॅन्ड्सकडून आली मोठी मागणी
बारामतीला रोज नोटा पोहच करेल असा गृहमंत्री शरद पवार शोधतात’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.