मुलाने नोकरी सोडून आईला दोन वर्षे १८ राज्यात ५६००० किलोमीटर फिरवले; तेही स्कूटरवर

आई आणि मुलाच्या नात्यातील गोड कथा आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतात. त्यातीलच आईसाहेब जिजाबाई आणि शिवाजी महाराज यांच्या विषयीच्या अनेक कथा आपल्याला ऐकायला मिळतात. त्यांनी दिलेली शिकवण महाराज शिवरायांना  आयुष्याच्या प्रत्येक वळणावर उपयोगी पडली.

तसेच श्रावण बाळाचे उदाहरण जवळपास सर्वच पालक आपल्या मुलांना सांगत असतात. ज्यांनी पालखी घेतली आणि आपल्या अंध आई-वडिलांना प्रवास घडविला. अश्या अनेक पूर्वीच्या थोर कथा आपल्याला ऐकायला मिळाल्या.

परंतु या कलियुगात अशी फारच कमी मुल आपल्याला पाहायला मिळतील. आई-वडिलांचा सांभाळ करण हेच अनेक मुलांना जमत नाही. परंतु कलियुगात अशी एक घटना घडली आहे, ज्याने आपल्या आईला ५६००० किमीचा प्रवास स्कूटरवर नेवून केला आहे.

कर्नाटकातील म्हैसूर येते राहणारे ४२ वर्षीय कृष्णा कुमार यांनी आपले आयुष्य आईच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. कृष्णा यांनी आपल्या ७० वर्षाच्या आईला देशभरातील तीर्थयात्रांना भेट देण्यास सुरुवात केली. त्यांनी स्कूटरवरून ४६,५२२ किलोमीटरचा प्रवास केला.

कृष्णा म्हणतात की, हा स्कूटर माझ्या वडिलांचा आहे. २००१ मध्ये त्यांनी मला भेट म्हणून दिला होता. २०१५ मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला. ते आमच्यात नाही म्हणून मी माझ्या आईला स्कूटरवरून नेण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच आम्ही तिघांनीही प्रवास केल्यासारखे आहे.

या संदर्भात कृष्णा यांच्या आई म्हणतात की, आम्ही या संपूर्ण प्रवासात कुठेही हॉटेलमध्ये थांबलो नाही. नेहमीच मंदिर, मठ, आश्रम यांमध्येच निवारा केला. तसेच या प्रवासादरम्यान मला कोणतीही आरोग्याची समस्या निर्माण झाली नाही. करण माझ्या मुलांनी माझी चांगली सेवा केली.

कृष्णा बंगरूळ येथे एका खाजगी कंपनीत काम करत होते. आईला तीर्थ यात्रा घडवण्यासाठी त्यांनी नोकरी सोडून दिली. त्यानंतर ते आईसह देशभरातील अनेक तीर्थस्थळांवर २०० सालच्या आपल्या वडलांनी भेट दिलेल्या स्कूटरवर गेले. त्यांनी २ वर्ष ९ महिन्यात कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतच्या सर्व धार्मिक स्थळांना भेट दिल्या.

त्या दोघांनी १६ जानेवारी २०१८ रोजी हा प्रवास सुरु केला. या प्रसाचे नाव त्यांनी ‘मातृ सेवा संकल्प यात्रा’ असे ठेवले. कोरोनामुळे सर्व बंद असल्या कारणाने त्यांना खूप त्रास झाला असे कृष्णा म्हणतात. परंतु स्थानिक आणि प्रशासनाने त्यांना मदत केली. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कृष्णा आपल्या आईसोबत मैसूर गावी परतले.

त्यांनी सांगितले की ते आता धर्माच्या मार्गावर चालणार. करण ते रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरित झाले आहे. लग्न न करता कृष्णा यांनी आयुष्भर आईची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा-

बाबो! रश्मिकाचा फॅन ९०० किलोमीटर प्रवास करुन आला तिला भेटायला, पण तिथं जाऊन भलतंच घडलं

VIDEO; तेरे ही सपने अंधेरों में उजालों में पाकिस्तानी तरुणीवर चाहते पुन्हा घायाळ

त्याने माझे क्लिवेज आणि मांड्यांना सुरवीन चावलाने सांगितला बॉलिवूडचा धक्कादायक अनुभव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.