प्रेमाच्या आठवड्यात त्यानं मृत्यूला कवटाळलं; प्रेयसीबद्दल चिठ्ठीत लिहिल्या धक्कादायक गोष्टी

मुंबई | आज व्हॅलेंटाईन डे…! अनेकजण या दिवसाची महिन्यांपासूनही पाहत असतील. आजचा दिवस हा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना सांगण्याचा दिवस. मात्र औरंगाबादेत एक धक्कादायक घटना घडली आहे.

प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून एका प्रियकरानं गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. त्याने आपल्या राहत्या घरी केबल वायरच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. कृष्णा खुटेकर असं आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे.

आत्म्ह्तेपुर्वी कृष्णा खुटेकरने चिठ्ठीत लिहिले आहे की, ‘प्रेयसी मला खूप त्रास देत आहे. मला काही काही धमक्या देत आहे. मी खून मानसिक तणावातून जात हे पाऊल उचलत आहे. तरी, माझी काही चूक नाही,’ असे त्याने लिहिले आहे. पोलिस तपासात मृतदेहाच्या खिशात ही चिठ्ठी सापडली आहे.

दरम्यान, संबंधित मुलगी मानसिक त्रास देत आर्थिक लुबाडणूक करत असल्याचाही आरोप संबंधित तरुणीवर करण्यात आला आहे. या घडल्या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 
शेतकऱ्याचा नादखुळा! शेतकरी उद्योजकाने खरेदी केले हेलिकॉप्टर…
उदयनराजे म्हणतात, ‘शिवजयंती साजरी झालीच पाहिजे पण….’
नीट बोलायचं असतं, चंद्रकांत पाटलांची गोपीचंद पडळकर यांना जाहीर समज…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.