VIDEO: मासे पकडायला गेलेल्या तरुणाच्या मागे लागली मगर, मग पहा पुढे काय झालं…

सोशल मीडियार अनेक रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडिओ भितीदायक असतात, तर काही व्हिडिओ मजेशीर. त्यामुळे काही व्हिडिओ खुप चर्चेचा विषय ठरत असतात.

आता असाच एक धडकी भरवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक तरुण मासे अकडायला गेला असताना अचानक त्याच्या समोर एक मगर आली आहे. ती पाहून त्याच्या चांगलीच तारांबळ उडाली आहे.

हा व्हिडिओ अमेरिकेतला आहे. त्या व्हिडिओमध्ये टॉमीली नावाचा एक तरुण मासे पकडण्यासाठी एका तलावाजवळ गेला होता. तेव्हा सकाळी सकाळी मासे पकडायला गेल्याने त्या परीसरात कोणीच नव्हते. मासे पकडतानाच एक मासा त्याच्या जाळ्यात अडकला होता.

त्यानंतर त्याने स्पुल रिल गुंडाळायला सुरुवात केली. तितक्यात एक महाकाय मगर त्याला तलावाच्या बाहेर आलेले दिसले. हे पाहून त्या तरुणाची चांगलीच घाबरगुंडी उडाली असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर तो थेट जंगलाकडे पळताना व्हिडिओमध्ये दिसते.

हा सर्वप्रकार मगर पण पाहत होती, तिने टॉमीला पाहिले अन् तिने थेट त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. या धावपळीत तो तरुण जमिनीवर पण पडला पण सुदैवाने तो त्या मगरीच्या तावडीत सापडा नाही.

त्यानंतर ती मगर पुन्हा त्या तलावात जाताना दिसते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या खुप व्हायरल होत आहे . ८ मे रोजी हा व्हिडिओ युट्युबवर अपलोड केला होता. आता या व्हिडिओला दिड लाखपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

त्यांनी माझ्या पाठीत खंजीर खूपसला; श्रेयस तळपदेचा बाॅलीवूडबाबत धक्कादायक गौप्यस्फोट
कुत्र्याला लाथ मारायला गेला रिक्षावाला आणि सुटला रिक्षाचा ताबा; पहा पुढे काय घडलं
नियम पायदळी तुडवून हळदीचा कार्यक्रम होता सुरू; कार्यक्रमात वाद झाला अन् पाहूण्यांना धू धू धुतलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.