निर्बंधातही भाजी विक्री करणाऱ्या आईवर मुलाची कारवाई, भाजीचे टोपले टाकले कचरा गाडीत

अहमदनगर । कोरोना काळात सरकारने नियम व अटी लागू केल्या आहेत. यामुळे सर्वांना ते लागू आहेत. नियम पाळले तरच आपण सर्वजण या संकटातून बाहेर पडणार आहे. यामुळे ते पाळले पाहिजेत. अशातच नात्यापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते हे अहमदनगर जिल्ह्यातल्या एक कर्मचाऱ्याने दाखवून दिले आहे.

येथील नगर परिषदेत काम करत असणाऱ्या रशीद शेख या कर्मचाऱ्याने भाजी विक्री करणाऱ्या आपल्या आईवरच कारवाई केली आहे. यामुळे कामात लांबीचा जवळचा घरातला न दाखवता त्याने सर्वांना समान नियम लागू केला.

यामुळे आपल्या आईवर देखील कारवाई करायला त्याने मागे पुढे पाहिले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
पाथर्डी तालुक्यात भाजी विक्री करण्यास बंदी आहे. त्यामुळे नगर परिषदेचे पथक बंदी असताना भाजी विक्री करणाऱ्यावर कारवाई करत आहे.

यावेळी रशीद शेख याची आई बेगम रफीख शेख या भाजी विक्री करत होत्या. यावेळी कोणताही विचार न करता रशीद शेख यांनी आपल्या आईच्या पुढे असलेल्या भाजीच्या टोपल्या उचलून कचरा गाडीत टाकल्या आणि कारवाई केली.

यावेळी सर्वांना एकच आश्चर्य वाटले मात्र त्यांनी कारवाई केली. यामुळे आपले काम कसे प्रामाणिक असावे हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

राज्य सरकारने तसेच स्थानिक प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नियम लागू केले आहेत, मात्र अनेकजण हे नियम पाळत नाहीत यामुळे कोरोनाचा प्रसार वाढत आहे. यामुळे नियम पाळने गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

झोपण्यापूर्वी उशीखाली लिंबू ठेवल्यास आयुष्यातील ‘या’ त्रासांपासून नक्की मुक्ती मिळवाल

रुग्णवाहिकेचे बिल तब्बल १ लाख २० हजार घेणाऱ्या डॉक्टरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

कोरोना लस टोचताच अंकिता लोखंडेने सुरु केला स्वामींचा जप; पहा तिचा मजेदार व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.