शेतकऱ्यांवर पाण्याचे फवारे; बॉक्सर विजेंदर सिंग म्हणतोय, ‘अण्णा हजारे आता कुठे आहात तुम्ही?

मुंबई | हरियाणामधल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्याविरुद्ध चलो दिल्ली आंदोलन तीव्र केले. दिल्लीकडे निघालेल्या या मोर्चाला हरियाणामध्ये अंबाला-पटियाला बॉर्डरवर अडवण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संघर्ष पेटला.
कृषी कायद्यांविरुद्ध राजधानी दिल्लीवर मोर्चा काढून चाल करून येणाऱ्या शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी हरियाणा पोलिसांनी अंबालाजवळ पाण्याचे फवारे मारले आणि अश्रुधूराचा वापर केला. शेतकऱ्यांनीही मोर्चा रोखण्यासाठी लावलेले संरक्षण कठडे उचलून नदीत फेकून दिले आणि दगडफेक केली.
याच पार्श्वभूमीवर बिजिंग ऑलिंपिक स्पर्धेतील ब्रांझ पदकविजेता बॉक्सर विजेंदर सिंगने ट्विट केले आहे. ‘देशातील शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा दर्शवत, असंच, पण आज अन्ना हजारेंची आठवण येतेय, असे विजेंदर सिंगने म्हंटले आहे.
अन्ना हज़ारे जी अब तो आजाओ #BharatBandh 🇮🇳
— Vijender Singh (@boxervijender) November 26, 2020
दरम्यान, विजेंदर सिंगची ही पोस्ट माजी केंद्रीय कायदामंत्री डॉ. अश्वानी कुमार यांनी रिट्विट करत त्याचं कौतुक केले आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल अभिमान वाटतो, असेही ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
पंढरीचा पैलवान गेला! राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तडफदार आमदार भारत भालके यांचं पुण्यात निधन
अर्णब गोस्वामींचा जामीन वाढवत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला दिला झटका, म्हणाले…
एकीकडे वडिलांचा मृतदेह आणि दुसरीकडे विराटने ठोकले मैदानात शतक; वाचा डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.