बॉक्स ऑफिसवर होणार युद्ध! प्रभास, महेश बाबू, आणि पवन कल्याणचे चित्रपट एकाच दिवशी होणार रिलीज

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे अनेक नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहे बंद आहेत. आता मात्र परिस्थिती सुधारत असून अनेक ठिकाणी सर्वकाही खुले होणार आहेत.

यामुळे अनेक चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू, प्रभास आणि पवन कल्याण यांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. यामुळे मोठे युद्ध सुरू होणार आहे.

यामध्ये प्रभासने आपला ‘राधेश्याम’ हा चित्रपट पुढच्या वर्षी १४ जानेवारी २०२२ रोजी, मकर संक्राती दिवशी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपटच मुळात एक रोमॅन्टिक लव्ह स्टोरी असणार आहे. या चित्रपटामध्ये प्रभाससोबत अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. यामुळे या चित्रपटाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.

प्रभाससमोर महेश बाबू आणि पवन कल्याण यांच्या जबरदस्त चित्रपटांचे आव्हान असणार आहे. महेश बाबू आणि पवन कल्याण तसेच राणा दब्बुगती यांनीही आपल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. यामुळे एकाच वेळी अनेक चित्रपट रिलीज होणार आहेत. यामुळे कोणता चित्रपट चालणार आणि कोणता पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे चित्रपट देखील येत्या वर्षातील मकर संक्रातीच्याच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. प्रभासचा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार असून महेश बाबू, पवन कल्याण तसेच राणा दब्बुगती यांचे चित्रपट स्थानिक स्तरावर प्रदर्शित होणार आहेत.

तसेच अक्षय कुमार, हुमा खुरेशी, वाणी कपूर यांची भूमिका असलेला ‘बेल बॉटम’ हा चित्रपट १९ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. यामुळे याची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. चाहते देखील वाट बघत आहेत.

ताज्या बातम्या

आंघोळ करताना बाथरूममध्ये जास्तकरून हार्ट अटॅक का येतो? धक्कादायक कारण आले समोर…

‘आई कुठे काय करते’ मालिकेत अरुंधती पुन्हा सोडणार आपलं घर, पहा पुढे काय घडणार

नोराच्या ‘जालिमा कोका कोला’ ला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद! तीनच दिवसात पार केला तीन कोटी व्ह्युजचा टप्पा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.