“महाराष्ट्र पोलिसांचे नाव बदनाम करण्याचे कार्य केल्याबद्दल भाजपा नेत्यांना साष्टांग दंडवत”  

कर्जत । अभिनेता सुशांत सिंह राजपूत तपास आता सीबीआय करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याला बुधवारी मंजुरी दिली.

यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे.
“सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचे न्यायालयानेच स्पष्ट केले हे बरे झाले.

यानिमित्ताने बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचे नाव देशात कमी करण्याचे ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना साष्टांग दंडवत,” असे म्हणत रोहित पवार यांनी भाजपावर हल्लाबोल केला.

सुशांतसिंग आत्महत्या प्रकरण देशात गाजले आहे. याचा तपास कोणी करायचा यावरून जोरदार राजकारण पेटले आहे.

आता सीबीआय हा तपास करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यामध्ये अजून कोणाची चौकशी केली जाते हे आता लवकरच समजणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.