प्रत्येक जोडप्याला आपल्या स्वतःचे एखादे घर असावे अशी इच्छा असते. अनेकजण घरासाठी खूप पैसे देखील खर्च करतात. काही वेळा लोक घर विकत घेत असताना घाई करतात. यानंतर अनेकदा लोकांना पश्चात्ताप सामना करावा लागतो. असाच काहीसा प्रकार ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका जोडप्यासोबत घडला आहे.(bought a house for only 100 rupees)
या जोडप्याने एक युरो म्हणजे अवघ्या १०० रुपयांत घर विकत घेतले. या करारामुळे जोडपे आनंदी झाले होते. पण त्यांचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. ज्यावेळी ते जोडपं या नवीन घरात शिफ्ट झालं, त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. या डीलमुळे त्या जोडप्याला फार मोठ धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिटनमधील कोब्रिजमध्ये एका जोडप्याने नवीन घर विकत घेतले होते. हा व्यवहार केवळ १०० रुपयांत करण्यात आला होता. सुरवातीला घर पाहून जोडप्याला हा एक फायदेशीर करार वाटला होता. पण नवीन घरात शिफ्ट झाल्यानंतर या जोडप्याला त्यांची फसवणूक झाल्याचे समजले.
या जोडप्याने विकत घेतलेल्या घराबाहेर लोक कचरा आणि रद्दी टाकायचे. घराबाहेर कचऱ्याचे ढीग पाहून या जोडप्याला धक्का बसला. या कारणास्तव हे घर अवघ्या १०० रुपयांना विकले गेले होते. महत्वाची बाब म्हणजे हे घर सेंच्युरी स्ट्रीट आणि डेबिंग स्ट्रीटच्या भागात आहे. या भागातील सर्व घरे एकमेकांना जोडून आहेत.
त्यामुळे या ठिकाणी प्रचंड अस्वच्छता आहे. त्यामुळे कौन्सिलने हे घर केवळ एक पौंडात म्हणजेच १०० रुपयांना विकले आहे. या ठिकाणी ड्रग्जचे व्यसन करणारे लोक फिरत असतात. याशिवाय या ठिकाणी चोरीच्या घटना देखील घडतात. येथील वातावरण चांगले नाही. या ठिकाणी राहणारे लोक घर विकून जात आहेत. या गोष्टी समजल्यानंतर त्या जोडप्याला खूप वाईट वाटले आहे.
जोडप्याच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने सांगितले की, तिने हे घर ३३ वर्षांपूर्वी घेतले होते. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. पण हळूहळू परिस्थिती बिघडत गेली. या भागातील अनेक लोक अमली पदार्थांची विक्री करतात. आज प्रत्येकजण येथून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळेच या ठिकाणची घरे कवडीमोल भावाने विकली जात आहे.
महत्वाच्या बातम्या :-
..त्यावेळी काही सैनिकांनी मला चुकीच्या अवस्थेत पाहिलं होतं, करण जोहरने सांगितला लाजिरवाणा किस्सा
‘या’ शुगर स्टॉकमुळे गुंतवणूकदारांचे आयुष्य झाले गोड, वर्षभरात दिला तब्बल ४४० टक्के परतावा
मलिकांची सुटका नाहीच! आता ईडीच्या विरोधातील याचिका फेटाळत कोर्टाने दिला ‘हा’ मोठा निर्णय