“महाराष्ट्राच्या जनतेला उध्दव ठाकरे आणि नरेंद्र मोदी दोघांमध्येही भविष्य दिसत नाही”

मुंबई| कोरोनाची लाट ओसरत नाही तोच तौत्के चक्रीवादळाने धुमाकूळ घातला होता. या चक्रीवादळामुळे पश्चिम किनार पट्टीवर मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महाराष्ट्र, गुजरात राज्याला तौत्के चक्रीवादळाचा चांगलाच फटका बसला.

राज्यात तौत्के चक्रीवादळाच्या पाहणीवरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र  मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. यामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना टोला लगावला आहे. पंतप्रधानांना गुजरातच्या पुढे काही दिसत नाही, मुख्यमंत्र्यांना मुंबई महापालिकेच्या पुढे काही दिसत नाही आणि महाराष्ट्राच्या जनतेला दोघांमध्ये भविष्य दिसत नाही. असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काल पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ठाकरे सरकारवर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांचे स्वत:च्या राज्यावर प्रेमही आहे.

पण आमचे मुख्यमंत्री मुंबईत राहूनही घराबाहेर पडत नाहीत. सध्या राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी काहीही केले तरी ते माफ असते. इतर कोणत्या पक्षाने काही केले तर ते राजकारण ठरते, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली होती.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर

कोकणात तौत्के चक्रीवादळामुळे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. नुकसान झालेल्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी. अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
देवेंद्र फडणवीसांनी राज्यभर फिरण्यासाठी ई-पास काढलाय का? थेट मुख्य सचिवांकडे विचारणा
लसीकरणानंतरही किती लोकांना झालीये कोरोनाची लागण? धक्कादायक आकडेवारी आली समोर
मोठी बातमी; महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय; पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय घेतला मागे

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.