टिकटॉक बंदीनंतर माझ्या दोन्ही बायका ढसाढसा रडल्या..; वाचा टिकटॉक स्टारची व्यथा

 

धुळे। आपण स्टार व्हावे, सेलिब्रिटी व्हावे, आपलेही चाहते असावेत असे प्रत्येकाला वाटते. आणि हे स्वप्न साकार केले ते टिकटॉकने. भारतातील सर्वाधिक पसंतीच्या टिकटॉक अॅपने फक्त शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागालाही वेड लावले होते.

ग्रामीण भागातील लोकही टिकटॉकवर स्टार (tiktok star) झाले, इतकीच नव्हे तर बहुतेकांनी कमाईही केली होती. मात्र आता भारतात टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर या स्टार्सवर मोठे संकट कोसळले आहे.

अशाच स्टार्सपैकी एक म्हणजे महाराष्ट्रातील धुळ्यात राहणारे दिनेश पवार. पवार हे आपल्या दोन बायकांसह टिकटॉक स्टार झाले होते. पवार आणि त्यांच्या दोन्ही बायका ९० च्या दशकातील बॉलीवूड गाण्यांवर डान्स करायचे.

या व्हिडीओमुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली. शिवाय त्यांनी ३० लाख रुपयांची कमाई देखील केली होती. टिकटॉकवर बंदीनंतर प्रतिक्रिया देताना त्यांनी आपण आता उद्धवस्त झाल्याचे म्हंटले आहे.

द प्रिंटशी बोलताना दिनेश म्हणाले, “आम्ही आता उद्धवस्त झालो, मात्र अशी परिस्थिती फक्त आमचीच नाही हे आम्हाला समजले. माझ्या दोन्ही बायकांनी ही बातमी पाहिली आणि त्या रडूच लागल्या.

आमच्यासारख्या लाखो लोकांना असेच दु:ख झाले असणार. आता आम्ही युट्युबर आमचे व्हिडीओ बनवण्याचा निर्णय घेतला आहे”. गेल्या काही दिवसांमध्ये Tik Tok हे भारतात प्रचंड लोकप्रिय झाले होते.

देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम ६९ ‘अ’ च्या अंतर्गत या अँपवर बंदी घातल्याने या स्टार्सचे काय होणार असा प्रश्न विचारला जातोय. अनेक युवकांनी तर नोकरी सोडून असे व्हिडीओ तयार केले आहेत. त्यातून त्यांना लाखोंची कमाईसुद्धा झाली आहे.

या युवकांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यामुळे या युवकांना अनेक कंपन्या स्पॉन्सरही करत आहेत. त्याचबरोबर त्यांना जाहिरातीसुद्धा मिळत आहेत. आता या तरुणांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.