ठाकरे सरकारचे डोळे उघडले! एसटी कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार आणि दिवाळी बोनस जाहीर

मुंबई | एसटी मंडळाचा कमी पगार तसेच सरकारचा कारभार याला कंटाळून एसटी मंडळात वाहक पदावर काम करत असलेल्या मनोज चौधरी यांनी आत्मह.त्या केली आहे. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली. यानंतर खडबडून जाग आलेल्या ठाकरे सरकारने लगेचच एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस आणि एक महिन्यांचा पगार देण्याची घोषणा केली आहे.

‘एसटी कर्मचाऱ्यांनी कुठलंही टोकाचे पाऊल उचलू नये, आम्ही त्यांच्या वेतनासाठी बँकेकडे कर्ज मागितले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना लगेच एक महिन्याचं वेतन देणार आहे, तर अजून एका पगाराची व्यवस्था दिवाळी आधी करण्याचा प्रयत्न आहे,’ अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

याबाबत ते पत्रकारांशी बोलत होते. ‘एसटी कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार थकला आहे. त्यात या महिन्याचा पगार तासाभरात केला जाईल अशी माहिती परब यांनी दिली आहे. दिवाळीपूर्वी आणखी एका महिन्याचा पगार देण्याचेही त्यांनी आश्वासन परब यांनी दिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट, सप्टेंबर महिन्याचा पगार देण्यासाठी पत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने पत्रक जारी केले असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी हे तात्पुरते संकट आहे, टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन परब यांनी केले. तसेच एसटीच्या ज्या दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्यांच्याशी संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत. आज एका तासात महिन्याचा पगार आणि सणाची अग्रणी रक्कम वळती केली जाईल, असे परब यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्याची आत्मह.त्या
मनोज चौधरी यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईट नोट लिहून ठेवली आहे. ‘एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्म.हत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना)

तसेच माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी वीमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करा. असे मनोज चौधरी यांनी सुसा.ईट नोट मध्ये लिहून ठेवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या
बाॅलीवूडमध्ये काम करण्यासाठी इरेला पेटलेल्या दिशाने शिक्षण अर्ध्यावर सोडलं होतं; वाचा पुर्ण किस्सा..
बाॅलीवूड चित्रपटांमधील ‘ही’ सुंदर अभिनेत्री आहे सुपरस्टार गोविंदाची मुलगी
ब्लॅक चित्रपटासाठी अमिताभ बच्चनने फुकट काम केले होते; कारण ऐकल्यावर अभिमान वाटेल
८० च्या दशकातील बालकलाकार बेबी गुड्डू आता अशी दिसतेय की डोळ्यांवर विश्वास बसनार नाही

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.