Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी नारायण राणेंना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. त्यामुळे नारायण राणेंसाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील अधीश बंगल्याचे बांधकाम अनधिकृत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने या बंगल्याच्या बांधकामावर आक्षेप घेत नारायण राणेंना नोटीस बजावली होती.
पुढे नारायण राणे यांनी हायकोर्टात या बंगल्याचे बांधकाम नियमित व्हावे ही मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र, हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. तसेच या प्रकरणावर आज कोर्टाने निकाल सुनावला आहे.
या प्रकरणावर हायकोर्टानाने मुंबई महापालिकेला कारवाई करण्याची परवानगी दिली आहे. तसेच अनधिकृत बांधकाम केल्याचे सांगत नारायण राणेंना १० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अधीश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेशही हायकोर्टाने दिले आहे.
नारायण राणेंच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले असल्याची तक्रार माहिती अधिकारी कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी केली होती. सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून हे बांधकाम केले असल्याची तक्रार त्यांनी केली होती. या तक्रारीनंतर मुंबई महापालिकेकडून या बंगल्याची पाहणी करण्यात आली होती.
त्यानंतर महापालिकेने नारायण राणेंना नोटीस बजावली होती. पुढे नारायण राणेंनी याप्रकरणी कोर्टात धाव घेतली. तसेच या बंगल्याचे बांधकाम नियमित करण्याची याचिका त्यांनी दाखल केली होती. त्यांनतर आता कोर्टाने राणेंची याचिका नाकारत त्यांना दणका दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
BJP : जळगावात भाजपाच्या चारी मुंड्या चीत, गिरीश महाजनांना भोपळा, कुणी मारली बाजी?
Ambadas Danve : शिवसेना सोडून गेलेल्या गद्दारांना पाडण्यासाठी दानवेंनी कट्टर शिवसैनिकांना दिला ‘हा’ कानमंत्र
Shivsena : “सरकारने परवानगी नाकारली तर थेट शिवतीर्थाच्या आतमध्ये घुसून दसरा मेळावा घेणार”; शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
Ramdas Kadam : उद्धव ठाकरे मातोश्रीत लपून बसायचे आणि रश्मी कंत्राटदारांना…; रामदास कदमांचे सणसणाटी आरोप