या आहेत बॉलिवूडच्या ४ सर्वात श्रीमंत जोड्या; तिसऱ्या जोडीकडे तर आहे चक्क १००० कोटींची संपत्ती

बॉलीवूड कलाकार नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांची लाइफस्टाइल आणि फॅशन हे लोकांसाठी चर्चेचा विषय असतात. अनेक अभिनेते त्यांच्या महागड्या लाइफस्टाइलमूळे चर्चेत असतात.

फक्त एक दोन कलाकार नाही तर बॉलीवूडचे अनेक कपल्स देखील नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्याकडे असलेल्या पैशांमूळे त्यांची लाइफस्टाइल खुप महागडी आहे. ज्या कपलकडे सर्वात अधिक पैसे आहेत. त्यांना पावर कपल म्हटले जाते. जाणून घेऊया बॉलीवूडच्या पावर कपल्सबद्दल.

१)शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा – शिल्पा शेट्टी बॉलीवूडच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अनेक वर्षे बॉलीवूडमध्ये राज्य केल्यानंतर शिल्पा शेट्टीने लग्न केले. तिने बॉलीवूडमध्ये काम करून करोडो रुपये कमवले आहेत.

त्यासोबतच तिने करोडपतीशी लग्न केले आहे. शिल्पा शेट्टीने राज कुंद्रासोबत लग्न केले. राज कुंद्रा खुप मोठा बिजनेस मॅन आहे. तो करोडोंचा मालक आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची एकूण प्रॉपर्टी ८००० करोडची आहे.

२)जया बच्चन आणि अमिताभ बच्चन – बॉलीवूडच्या पावर कपलमध्ये या दोघांचे नाव सर्वात पहिले येते. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे दोघेही बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते आहेत. या जोडीचे अनेक चित्रपट हिट झाले आहेत.

अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चन देखील बॉलीवूड अभिनेता आहे. या सर्वांची एकूण संपत्ती १००० करोडपेक्षा अधिक आहे. त्यामूळे हे बॉलीवूडमधले सर्वात पावरफुल कपल आहे.

३)राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा – राणी मुखर्जी अनेक वर्षे बॉलीवूडची राणी होती. तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामूळे तिने चित्रपटांमधून करोडो रुपये कमवले आहेत.

राणी मुखर्जीने निर्माता आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत लग्न केले आहे. या दोघांची जोडी बॉलीवूडच्या सर्वात हिट जोडयांपैकी एक आहे. या दोघांकडे १००० करोडची संपत्ती आहे.

४)शाहरुख खान आणि गौरी खान – शाहरुख खानला बॉलीवूडचा किंग खान बोलले जाते. गेले अनेक वर्षे तो बॉलीवूडमध्ये राज्य करत आहे. त्यामूळे त्याच्याकडे खुप जास्त पैसा आहे.

शाहरुख खानची पत्नी गौरी खान ही फॅशन डिझायनर आहे. त्यासोबतच ती निर्मिती म्हणून देखील काम करते. त्यामूळे या दोन्ही पती पत्नीकडे पैशांची कमी नाही. शाहरुख आणि गौरी खानकडे एकूण ६००० करोडची संपत्ती आहे.

महत्वाच्या बातम्या-

रियाच्या चौकशीमध्ये बॉलीवूडमधील नामांकीतांचा पर्दाफाश; समोर आली २५ मोठी नावे

व्हायरल व्हिडीओमुळे समजले सुशांत आणि रिया सोबतच करायचे ‘ही’ गोष्ट

मुलांच्या ट्युशन घेऊन अभ्यास करत झोपडपट्टीतील मुलीने पास केली युपीएससी परीक्षा

‘या’ अभिनेत्रीने पतीला घटस्फोट दिल्यानंतर बॉयफ्रेंडच्या बाळाला दिला जन्म

मृत्यूनंतर एवढी प्रॉपर्टी सोडून गेली होती दिव्या भारती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.