बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्री आहेत स्पष्टवक्त्या; एकीच्या वक्तव्याने तर बॉलीवूडमध्ये उभे केले होते तूफान

बॉलीवूडमध्ये नाव कमावणे साधे काम नाही. फिल्म इंडस्ट्रीमध्ये टिकून राहणे आणि त्यातल्या अन्यायाविरुद्ध बोलणे खुप कठिण आहे.

बॉलीवूडचे अनेक कलाकार समाजातील आणि इंडस्ट्रीतील वाईट गोष्टींबद्दल बोलणे टाळत असतात. पण काही कलाकार समाजातील आणि इंडस्ट्रीतील वाईट गोष्टींबद्दल नेहमी बिनधास्त बोलत असतात.

बॉलीवूडमधले अनेक कलाकार आपल्या कामाशी मतलब ठेवतात. ते जास्त कोणत्याही गोष्टीबद्दल बोलत नाहीत.

पण बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्र्या आहेत ज्या आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे ओळखल्या जातात. त्या इंडस्ट्रीतील आणि देशातील सामाजिक मुद्यांवर उघडपणे आपले मत व्यक्त करतात.

बॉलीवूडच्या अभिनेत्रींसाठी या गोष्टी सहज शक्य नाहीत. पण या वातावरणामध्ये देखील अशा अनेक अभिनेत्री आहेत. ज्या सर्व गोष्टींवर स्पष्टपणे बोलतात.

कंगना रनौवत – कंगनाला बॉलीवूडची क्वीन म्हणून ओळखले जाते. ती नेहमी तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे वादाच्या भवऱ्यात सापडते.

कंगनाने बॉलीवूडमध्ये खुप कमी दिवसांमध्ये स्वत: चे नाव बनवले आहे. ती बॉलीवूड आणि देशातील प्रत्येक गोष्टीला खुप धैर्यानेसामोरे जाते.

कंगना सगळ्या गोष्टींवर नेहमीच बोलत असते. त्यामूळे ती बॉलीवूडची क्वीन आहे. बॉलीवूडमधले नेपोटिझम असो किंवा एखादा सामाजिक प्रश्न ती नेहमीच सर्व गोष्टींबद्दल बोलत असते.

पायल राहत्यागी – बॉलीवूड अभिनेत्री पायल राहत्यागीचे देखील या यादीत नाव आहे. ती बॉलीवूड आणि समाजातल्या अनेक गोष्टींबद्दल बोलत असते.

पायलचे युट्युबवर चॅनेल आहे. ती त्यावर बॉलीवूडशी निगडित अनेक विडिओ बनवते. तसेच देशातील अनेक मुद्यांवर आपले मत व्यक्त करत असते.

स्वरा भास्कर – कंगनाप्रमाणेच स्वरा भास्कर देखील बॉलीवूडचे एक प्रसिद्ध नाव आहे. स्वरा देखील देशातील अनेक मुद्दयांवर स्पष्टेपणे बोलत असते.

स्वराने देशातील सीएए आणि एन आर सीच्या मुद्यावर तिचे मत स्पष्टेपणे मांडले होते. ती सामाजिक प्रश्नांवर देखील बोलत असते.

तनूश्री दत्ता – तनूश्री दत्ताने बॉलीवूडमध्ये मी टू मूवमेंटची सुरुवात केली होती. तिने नाना पाटेकरवर तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा आरोप लावला होता.

तिच्या स्पष्टपणे बोलण्यामूळे तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पण याच स्पष्टपणामूळे बॉलीवूडची दुसरी बाजू देखील लोकांसमोर आली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.