तब्बूच्या साड्यांना इस्त्री करत होता बॉलीवूडचा ‘हा’ दिग्दर्शक; आज एका चित्रपटासाठी घेतो करोडो रुपये

हिंदी फिल्म इंडस्ट्री म्हणजेच बॉलीवूड आज सगळ्या जगात प्रसिद्ध आहे. बॉलीवूडमध्ये काम मिळवण्यासाठी कलाकार मुंबईत येतात. कारण तुम्ही जर एकदा बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध झालात तर मग सगळ्या जगात तुम्हाला ओळखले जाऊ शकते. तुम्ही सर्वात मोठे सुपरस्टार होऊ शकतात.

पण बॉलीवूडमध्ये यश मिळवणे सोपी गोष्ट नाही. बॉलीवूडमध्ये नाव कमवण्यासाठी तुम्हाला खुप जास्त मेहनत करावी लागते. सुरुवातीच्या दिवसांमध्ये तुम्हाला कोणतेही काम करावे लागते. तुम्हाला खुप जास्त मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते आणि असे अनेक कलाकार आहेत जे मेहनत करुन इंडस्ट्रीमध्ये नाव कमवत आहेत.

अशाच एका दिग्दर्शकाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. या दिग्दर्शकाने अनेक वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये छोटी मोठी काम केली आहेत. त्यानंतर त्याला बॉलीवूडमध्ये यश मिळाले. या दिग्दर्शकाचे नाव आहे रोहित शेट्टी. रोहित शेट्टी फिल्म इंडस्ट्रीतील खुप मोठे नाव आहे.

रोहित शेट्टीसोबत काम करण्यासाठी बॉलीवूडमधले मोठे मोठे कलाकार वाट बघत आहेत. पण एककाळ असा होता, ज्यावेळी रोहित शेट्टी बॉलीवूड अभिनेत्यांसाठी स्पॉट बॉयचे काम करत होता. त्याने करिअरच्या सुरुवातीला इंडस्ट्रीमध्ये अनेक छोटी छोटी काम केली आहेत.

१९९५ मध्ये रोहित शेट्टी इंडस्ट्रीमध्ये नवीन होते. ‘हकिकत’ चित्रपटाच्या सेटवर ते स्पॉटबॉयचे काम करत होते. या चित्रपटामध्ये तब्बू मुख्य भुमिका साकारत होती. त्यावेळी रोहित शेट्टी तब्बूच्या साडीला इस्त्री करत होते. एवढेच नाही तर रोहितने काजोलच्या मेकअपसाठी स्पॉटबॉय म्हणून काम केले आहे.

अजय देवगन आणि रोहित शेट्टीची जोडी प्रेक्षकांना खुप जास्त आवडते. रोहितने अजयच्या फुल और कांटे, सुहाग, राजू चाचा, प्यार तो होना ही था चित्रपटांमध्ये आसिस्टिंट दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. त्यानंतर २००३ मध्ये ‘जमीन’ चित्रपटातून त्याने त्याचा प्रवास सुरु केला.

अजय देवगन आणि रोहित शेट्टीचा गोलमाल चित्रपट सुपरहिट झाला होता. या चित्रपटानंतर रोहित शेट्टीने मागे वळून पाहीले नाही. त्याने गोलमाल सिरीज, सिंघम, चैन्नई एक्सप्रेस, दिलवाले अशा सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ज्या कलाकारांसाठी तो स्पॉटबॉय म्हणून काम करत होता. ते कलाकार आज त्याच्यासोबत काम करण्यासाठी वाट बघत असतात.

महत्त्वाच्या बातम्या –

‘फॅशन’ चित्रपटातील अभिनेत्रीने १४ वर्ष मोठ्या बॉयफ्रेंडसोबत केले बिकनी फोटोशूट; पहा फोटो

आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्मह.त्या; त्याआधी फेसबुक पोस्ट करत म्हणाली…

जाणून घ्या ५० व्या वर्षी २५ वर्षांची दिसणाऱ्या मलायकाचे फिटनेस रहस्य; रोज करते ‘ह्या’ गोष्टी

सैफच्या बेडरुममधील ‘या’ वाईट सवयीला वैतागली आहे करिना; म्हणाली, मी झोपलेली असतानाही तो मला…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.