बॉलीवूड उत्तर प्रदेशला हलवण्याच्या प्रक्रियेला वेग, योगी आदित्यनाथ यांनी घेतली अक्षय कुमारची भेट

मुंबई । सुशांत आत्महत्या प्रकरणानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश मध्ये भव्य फिल्म सिटी उभारणार आल्याचे जाहीर केले. त्यासाठी ते अनेकांशी चर्चा करण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी अक्षय कुमारची भेट देखील घेतली आहे.
योगी आदित्यनाथ दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी अक्षय कुमार सोबत उत्तर प्रदेशमधील गौतमबुद्ध नगर येथील यमुना एक्सप्रेस वे जवळ तयार होणाऱ्या फिल्मसिटीबाबत चर्चा केली. योगी यांनी अक्षय कुमारची भेट घेतल्यानंतर ट्विटरवर या भेटीबाबत माहिती दिली.
योगी म्हणाले, आज मुंबईत भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार यांची भेट घेतली. चित्रपटसृष्टीतील विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांचा कामातील ध्यास तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
आज मुंबई में भारतीय फिल्म जगत के लोकप्रिय अभिनेता श्री @akshaykumar जी से शिष्टाचार भेंट हुई।
चलचित्र जगत के विभिन्न पहलुओं के संबंध में उनसे सार्थक विमर्श हुआ।
अपने कार्य के प्रति उनकी समझ, लगन और रचनाधर्मिता युवाओं के लिए प्रेरणास्पद है। pic.twitter.com/O9kBEGy9mh
— Yogi Adityanath (@myogiadityanath) December 1, 2020
महाराष्ट्रातून याला विरोध होत असला तरी उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या राज्यातील कलाकारांकडून समर्थन केले जात आहे. नव्या फिल्मसिटीच्या निर्माणामुळे हिंदी कलाकारांच्या रोजगाराचा प्रश्न सुटेल, अशी काही कलाकारांनी आशा आहे.
योगी आदित्यनाथ उद्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला जाणार आहेत. त्यानंतर ते दुपारी गुंतवणुकदार आणि चित्रपट निर्मात्यांशी चर्चा करणार आहेत. उद्योगपतींशी चर्चा केल्यानंतर योगी आदित्यनाथ पत्रकार परिषद घेतील.
योगी आदित्यनाथ यांच्या या पावलामुळे नवोदित कलाकारांना बॉलिवूडमध्ये जाण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागणार नाही, अशी अनेकांना आशा आहे. राज्यातून मात्र योगींवर टीका केली जात आहे. शिवसेना आणि मनसे यावर आक्रमक झाली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.