प्रेमात धोका मिळाल्यामूळे आजही अविवाहीत आहेत बॉलीवूडचे ‘हे’ अभिनेते

बॉलीवूड कलाकारांचे लव्ह अफेअर नेहमीच चर्चेत असतात. रोज कोणत्या ना कोणत्या अभिनेत्याच्या अफेअरच्या बातम्या समोर येत असतात. त्यामूळे इंडस्ट्रीतील लव्ह अफेअरमध्ये काही नवीन नाही. पण बॉलीवूडमध्ये असे कलाकार आहेत. ज्यांनी अनेकदा प्रेम करुनही ते आज अविवाहीत आहेत. जाणून घेऊया अशाच काही कलाकारांबद्दल

१ सलमान खान – आपण बॉलीवूडच्या अविवाहीत कलाकारांबद्दल बोलतोय आणि त्यात सलमानचे नाव येणार नाही ही गोष्ट शक्य नाही. या यादीत पहीले नाव सलमान खानचे येते. आत्तापर्यंत सलमानचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. पण तो आजही अविवाहीत आहे.

ऐश्वर्या राय, संगीता बिजलानी, कतरिना कॅफ, सोमा अलीसारख्या अनेक अभिनेत्रींसोबत अफेअरमूळे चर्चेत राहिलेला सलमान आजही अविवाहीत आहे. एकदा तर त्याच्या लग्नाच्या पत्रिका देखील छापल्या गेल्या होत्या. पण लग्न होऊ शकले नाही.

२ उद्य चोप्रा – यश चोप्रा यांचा छोटा मुलगा उद्य चोप्रा देखील अविवाहीत आहे. त्याने आजपर्यंत लग्न केले नाही. सर्वात पहीले उद्यचे नाव तनिषा मुखर्जीसोबत जोडले गेले होते. त्यानंतर त्याच्या आयूष्यात नर्गिसने एन्ट्री केली. पण हे नाते लग्नापर्यंत जाऊ शकले नाही.

३ अक्षय खन्ना – अभिनेता अक्षय त्याच्या दमदार अभिनयामूळे नेहमीच चर्चेत असतो. त्याने आजपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण खऱ्या आयूष्यात मात्र तो अजूनही अविवाहीत आहे. त्याचे नाव करिश्मा आणि ऐश्वर्यासारख्या मोठ्या अभिनेत्रींसोबत जोडले गेले. पण त्याने अजूनही लग्न केले नाही.

४ अभय देओल – अभिनयाने तरुणींच्या मनावर राज्य करणारा अभय देओल देखील अजूनही अविवाहीत त्याने तो प्रीतीसोबत चार वर्ष रिलेशनशिपमध्ये होता. पण त्यांनी लग्न केले नाही. दोघांचे नाते ब्रेकअप संपले. आजही अभय लग्नाचे नाव काढत नाही.

५ संजीव कुमार – जुन्या काळातील प्रसिद्ध अभिनेते संजीव कुमार देखील अजीवन अविवाहीत होते. त्यांनी हेमा मालिनीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण हेमा मालिनीने धर्मेंद्रशी लग्न केले. त्यामूळे संजीव कुमार आयूष्यभर अविवाहीत राहिले.

महत्वाच्या बातम्या –
कसा काय रातोरात स्टार झाला एक साधारण जिंगल बनवणारा मुलगा, वाचा त्याची यशोगाथा
गायिका सुनिधी चौहानने आपल्या नवऱ्यासोबत सुरु असलेल्या वादावर सोडले मौन; म्हणाली
विवाहीत व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी मधुबाला त्यांच्या मुलांचा आणि पत्नीचा खर्च उचलायला होत्या तयार
मृत्यूपूर्वीच्या ‘या’ शेवटच्या व्हिडीओत तुफान नाचले किशोर नांदलस्कर; पाहून डोळे पाणावतील

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.