बॉलीवूडच्या ‘या’ कलाकारांनी कधीच केला नाही सावत्र आईचा स्वीकार; एक तर आईला म्हणाली चुडैल

फिल्म इंडस्ट्रीमध्ये कलाकारांचे दुसरे लग्न होणे किंवा लग्नानंतर अफेअर होणे यात काही नवीन नाही. अनेकदा आपण इंडस्ट्रीतील लोकांचे अफेअर आणि दुसरे लग्न याबद्दल ऐकत असतो. पण त्यांच्या या दुसऱ्या लग्नाच्या निर्णयामूळे कुटूंबातील अनेक सदस्यांचे आयूष्य खराब होते.

जर कलाकार अगोदरपासून विवाहीत असतील आणि त्यांना मुलं असतील. तर त्यांच्या दुसऱ्या लग्नामूळे पहील्या नात्यावर नक्कीच फरक पडतो. म्हणूनच इंडस्ट्रीमध्ये अनेक कलाकार असे आहेत ज्यांनी त्यांच्या सावत्र आईचा कधीच स्वीकार केला नाही. जाणून घेऊया अशाच कलाकारांबद्दल.

१ अर्जून कपूर आणि श्रीदेवी – बॉलीवूडच्या पहील्या लेडी सुपरस्टारचा किताब मिळवणाऱ्या श्रीदेवी सावत्र आई आणि होम ब्रेकर देखील बोलले गेले होते. कारण श्रीदेवी विवाहीत आणि दोन मुलांचे वडील बोनी कपूरसोबत लग्न केले. ज्यावेळी दोघांचे लग्न झाले त्यावेळी बोनी कपूर अगोदरपासूनच विवाहीत होते.

बोनीला अर्जून आणि अंशूला दोन मुलं होते. पण तरीही त्यांनी श्रीदेवीसाठी पहीली पत्नी मोना कपूरला घटस्फोट दिला आणि श्रीदेवीसोबत लग्न केले. या लग्नामूळे अर्जून कपूरला लहान वयातच खुप मोठा धक्का बसला होता याच कारणामूळे अर्जून कपूरने श्रीदेवीचा कधीच स्वीकार केला नाही. पण श्रीदेवीच्या मृत्यूनंतर तो बहीण जान्हवी आणि खुशीचा सांभाळताना दिसतो.

२ पुजा बेदी आणि परवीन दोसांज – अभिनेते कबीर बेदीने ७० व्या वर्षी परवीन दुसांजसोबत चौथे लग्न केले होते. परवीन कबीर बेदी पेक्षा २९ वर्षांनी छोटी आहे. या लग्नाच्या बातमीमूळे सर्वांनाच धक्का बसला होता. पण सर्वात मोठा धक्का तर कबीर बेदीची मुलगी पुजा बेदीला बसला होता.

धक्कादायक गोष्ट म्हणजे पुजा बेदी परवीन पेक्षा पाच वर्षांनी मोठा आहे. तिने कधीच परवीनला आई मानले नाही. एका ट्वीटमध्ये तर ती परवीनला चुडैल बोलली होती. ज्यामूळे त्यांच्या नात्यातील कडूपणा सर्वांसमोर आला होता.

३ हेमा मालिनी आणि बॉबी देओल – धर्मेंद्रसोबत दुसरे लग्न केल्यानंतर हेमा मालिनी चार मुलांची सावत्र आई बनली होती. महत्वाचे म्हणजे हेमा मालिनी धर्मेंद्रचा मोठा मुलगा सनी देओल पेक्षा फक्त नऊ वर्षांनी मोठी आहे. ज्यामूळे त्यांच्या नात्यात नेहमीच वाईटपणा आला.

सनी आणि बॉबीने हेमाला कधीच आई म्हणून स्वीकारले नाही. ते नेहमीच हेमापासून दुर राहतात. बॉबी देओल तर हेमा मालिनीचे नाव घेण्यापासून देखील वाचतात. त्यांना हेमा बिलकूल आवडत. पण त्यांचे बहीण इशा आणि आहानासोबत खुप चांगले संबंध आहेत.

४ प्रतिक बब्बर आणि नादिरा – प्रतिक स्मिता पाटील आणि राज बब्बरचा मुलगा आहे. राज बब्बरच्या पहील्या पत्नीचे नाव नादिरा आहे. आज प्रतिक आणि राज बब्बरचे संबंध चांगले झाले आहेत. पण एक काळ असा होता ज्यावेळी प्रतिक वडीलांचे नाव देखील लावत नव्हता.

स्मिता पाटीलने मुलाला जन्म दिल्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर राज बब्बर पहीली पत्नी आणि कुटूंबाकडे परत गेले. तर प्रतिक बब्बरला त्यांच्या आज्जीने लहानाचे मोठे केले. याच कारणामूळे प्रतिक बब्बरने नादिराचा आई म्हणून स्वीकार केला नाही.

महत्वाच्या बातम्या –
वयाच्या ७० व्या वर्षी देखील फिट राहण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी ‘हे’ काम करते रेखा
‘अग्गबाई सुनबाई’ मालिका होणार बंद? ‘या’ प्रसंगामुळे प्रेक्षकांची मने दुखल्याने मोठा फटका
सोनाली कुलकर्णीच्या घरात तुफान राडा; चाहत्याने वडिलांवर चाकू हल्ला करत केली ही अजब मागणी
या अभिनेत्रीमुळे करण जोहर राहिला अविवाहीत, आता ती आहे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.