Suraj Chavan: सोशल मीडियावर सध्या सूरज चव्हाण (Suraj Chavan) आणि संजना (Sanjana) यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओंनी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. लग्नाला मोठी गर्दी जमली होती, मात्र ज्यांनी हजेरी लावली नाही त्यांच्या गैरहजेरीचीच चर्चा सध्या जास्त रंगताना दिसते.
‘बिग बॉस ५’ मधील स्पर्धकांपैकी फक्त जान्हवी किल्लेकर (Janhavi Killekar) हिनेच लग्नाला उपस्थिती लावली. त्यामुळे इतर स्पर्धकांनी लग्न टाळण्यामागचं कारण काय, याबद्दल नेटकऱ्यांमध्ये कुतूहल निर्माण झालं आहे. विशेषत: बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण (Suraj Chavan) आणि ‘छोटा पुढारी’ म्हणून ओळखला जाणारा घन:श्याम दरोडे (Ghanshyam Darode) यांची चांगली मैत्री दिसत होती. त्यामुळे तो लग्नाला का आला नाही हा मोठा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला.
“याबाबत स्वतः घन:श्याम दरोडे (Ghanshyam Darode) यांनी एक व्हिडिओ शेअर करून स्पष्टीकरण दिलं. त्यांनी सांगितलं की, पूर्वनियोजित कार्यक्रमांसोबतच एका वृत्तवाहिनीसोबत झालेल्या करारामुळे त्यांना बाहेरगावी कुठेही जाता येत नव्हतं. तसेच लग्नाच्या दिवशी ते अमरावती (Amravati) येथे असल्याने सूरजच्या लग्नाला पोहोचू शकले नाहीत.
मात्र घन:श्यामचा हा खुलासा चाहत्यांना काही खास पटला नाही. त्यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर पद्धतीने ट्रोलिंग सुरू केली आहे. एकानं विचारलं, “तुला आमंत्रण होतं का?” तर दुसऱ्यानं चिमटा काढत लिहिलं, “आहेर द्यावा लागला असता म्हणूनच तू गेला नसशील!” अशा अनेक विनोदी प्रतिक्रिया त्यांच्या पोस्टवर पाहायला मिळत आहेत.”






