बॉलिवूडमधील काही जणांचे आयएसआयशी संबंध; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

 

नवी दिल्ली | भाजपचे माजी खासदार बैजयंत जय पांडा यांनी बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटीजचा पाकिस्तानातील सैन्यदल आणि आयएसआयशी संबंध असल्याचा दावा ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

विशेष म्हणजे पांडा यांनी आपण या संबंधित काही कागदपत्रे पाहिली असल्याचेही सांगितले आहे. पांडा यांनी जरी हा दावा केला असला तरी त्यांनी अजून कोणत्याही सेलिब्रेटचं नाव जाहीर केलेलं नाही.

पांडा यांनी हा खळबळजनक दावा करत बॉलिवूडमधील देशभक्त कलाकारांना पाकिस्तानशी संबंध ठेवणाऱ्या कलाकारांसोबत काम करु नका असे आवाहन देखील केले आहे.

पाकिस्तानातील काही लोक भारतातील काही कलाकारांसोबत व्यवसायिक आणि व्यक्तिगत संबंध ठेवत आहेत. हेच पाकिस्तानी जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराला प्रोत्साहन देतात असे पांडा यांनी म्हंटले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.