बॉलीवूडमध्ये अपयश, घरच्यांनी सोडले, राज किरण यांना करावे लागले मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल..

मुंबई । बॉलिवूडमध्ये दिवसेंदिवस अनेक कलाकार येतात आणि जातात. मात्र यामध्ये काही थोडेच कलाकार टिकून राहतात. काहीजण अचानक बॉलीवूड पासून दूर देखील जातात. तर काहीजण अगदी आपले वय झाले तरी बॉलिवूड मध्ये आपले नाव कायम टिकवून ठेवतात.

असेच बॉलीवूडमधील एक नाव म्हणजे राज किरण. त्यांनी ऋषी कपूर यांच्यासोबत कर्ज चित्रपटात काम केले होते. ८० च्या दशकात त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी सहाय्यक अभिनेत्याची भूमिका अनेक चित्रपटात केली होती.

त्यांनी पुढे टीव्ही शो मधून आपले नाव कमवले. मात्र अचानक त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि ते बॉलीवूडपासून लांब गेले. त्यांच्या चाहत्यांना ते कुठे आहेत. याबाबत अनेक प्रश्न पडले होते. त्यांचा शोध अनेकांनी याकाळात घेतला.

राज किरण हे डिप्रेशनमध्ये गेले होते. ते याकाळात अमेरिकेत असल्याचे सांगितले जात होते. याकाळात दीप्ती नवल यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून राज यांनी शोधण्याची मोहीम सुरू केली. मी राज यांनी शोधत आहे, ते अमेरिकेत असल्याचे बोलले जात आहे, कोणाला काही माहिती असल्यास कळवा असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले.

याकाळात ऋषी कपूर देखील अमेरिकेत गेले. यावेळी राज किरण यांच्या भावाने तो अटलांटाच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. २०११ मध्ये ते बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबाने दिली होती. यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू होत होत्या.

ते तेथे सापडले होते, मात्र ते आता देखील कुठे आहेत हे कोणालाही माहित नाही. यामुळे एक बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कुठे गायब झाला, त्यांच्या चाहत्यांना देखील हा मोठा प्रश्न पडला आहे.

ताज्या बातम्या

सुशांतच्या पुण्यतिथीच्या आधी रियाने शेअर केला पॉवरफुल मेसेज, चाहते म्हणाले, आम्ही तुझ्यासोबत..

सुशीलकुमारच्या हातात लाकडी दांडका, जखमी सागर धनगड हात जोडून जीवाची भिक मागत होता; पहा मर्डरच्या दिवसाचा व्हिडीओ

HRCT स्कोर 21 असतानाही बेडही मिळेना; जवानानं आईवर शेतातच केले उपचार, असा दिला लढा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.