राजकूमार संतोषीपासून विक्रम भट्टपर्यंत ‘हे’ दिग्दर्शक त्यांच्याच अभिनेत्रीच्या प्रेमात झाले होते पागल

हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आजपर्यंत अनेक प्रेम कहाण्या हिट झाल्या आहेत. अनेकदा ह्या प्रेम कहाण्या खऱ्या आयूष्यातही खऱ्या होतात. आजपर्यंत तुम्ही अभिनेता आणि अभिनेत्रीची प्रेम कहाणी ऐकली असेल. पण आज तुम्हाला दिग्दर्शक आणि अभिनेत्रीची प्रेम कहाणी सांगणार आहोत.

बॉलीवूडमध्ये असे अनेक दिग्दर्शक आहेत जे त्यांच्यात चित्रपटाच्या सेटवर त्यांच्या चित्रपटातील अभिनेत्रीवर प्रेम करुन बसले. एकदा नाही तर अनेकदा ही गोष्ट झाली आहे. काही दिग्दर्शकांनी तर अभिनेत्रीसाठी त्यांचा संसासरही मोडला होता. जाणून घेऊया कोण आहेत ते दिग्दर्शक.

१ राम गोपाल वर्मा – आपल्या चित्रपटांमूळे नेहमी चर्चेत असणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा देखील एका अभिनेत्रीच्या प्रेमात पागल झाले होते. ही अभिनेत्री होती रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर. रंगीला चित्रपटाच्या सेटवर दोघांच्या लव्ह स्टोरी सुरुवात झाली होती.

सगळ्या इंडस्ट्रीमध्ये दोघांच्या जोडीची चर्चा सुरु झाली होती. ही गोष्ट राम गोपाल वर्माच्या घरी पोहाचल्यानंतर त्यांच्या पत्नीने उर्मिलाच्या कानाखाली वाजवली होती. त्या दिवशी उर्मिला आणि राम गोपाल वर्मा दोघे वेगळे झाले आणि त्यांनी परत कधीच एकत्र काम देखील केले नाही.

२ विक्रम भट्ट – चित्रपट निर्माते विक्रम भट्टने त्यांची लहानपणीची मैत्रीणी आदितीसोबत लग्न केले होते. पण त्यांच्या आयूष्यात विश्व सुंदरी सुश्मिता सेनची एन्ट्री झाल्यानंतर ते आपल्या पत्नीला विसरुन गेले होते. सुश्मिताच्या प्रेमात पागल झालेल्या विक्रम भट्टने पत्नीला घटस्फोट दिला होता. पण या दोघांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही.

३ रोहित शेट्टी – ब्लॉकबास्टर चित्रपट बनवणारे दिग्दर्शत रोहित शेट्टीचे नाव देखील या यादीत शामील होते. फॅमिली मॅन रोहित शेट्टी अभिनेत्री प्राची देसाईच्या सुंदरतेने घायाळ झाले होते. प्राचीसाठी त्यांनी पत्नी माया आणि मुलांना सोडण्याचा निर्णय घेतला होता पण वेळ राहताच त्यांनी हा निर्णय बदलला.

४ राजकूमार संतोषी – दामिनीसारख्या हिट चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे राजकूमार संतोषी मिनाषी शेषाद्रीच्या प्रेमात पागल झाले होते. पण त्यांचे हे प्रेम एकतर्फी होते. त्यांना प्रेमात यश मिळाले नाही. मिनाषीने त्यांचा प्रेमाचा स्वीकार केला नाही.

महत्वाच्या बातम्या –
अमिताभ बच्चनला धडा शिकवण्यासाठी राजीव गांधींनी राजेश खन्नाची घेतली होती मदत
अभिनेत्री रेखा शारीरीक संबंधावर असे काही म्हणाल्या की, लोकांनी दिल्या शिव्या
पुरुषांच्या जवळ जाण्यासाठी रेखाने सांगितलेला पर्याय ऐकून उडाली होती लोकांची झोप; झाला होता मोठा गोंधळ
९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री रंभाची आता झालीये अशी अवस्था, वाचून धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.