Share

..म्हणून मला भारतीय पाकिस्तानात जा असं म्हणतात, बॉलिवूडच्या खानने व्यक्त केले दु:ख

‘८३’ आणि ‘बजरंगी भाईजान'(Bajrangi Bhaijaan) चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत कबीर खान यांनी देशभक्ती आणि राष्ट्रवाद या विषयांवर खुलेपणाने भाष्य केले आहे. काही लोक मला सातत्याने ट्रोल करतात आणि मला पाकिस्तानाचा जाण्याचा सल्ला देतात, असे दिग्दर्शक कबीर खान यांनी सांगितले आहे.(bollywood director kabir khan statement about patriotism)

एका मुलाखतीत दिग्दर्शक कबीर खान म्हणाले की, ” काही लोक मला सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल करतात आणि मला पाकिस्तानाचा जाण्याचा सल्ला देतात. या सर्व गोष्टींमुळे मला वाईट वाटते. पण ध्याच्या काळात सोशल मीडियामुळे लोकांना काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. दहा वर्षांपूर्वी लोक हे करू शकत नव्हते.”

“आजच्या काळात लोक जबाबदारीने शब्दांचा वापर करत नाहीत. हे ऐकायला वाईट जरी वाटत असले तरी ते सत्य आहे. सोशल मीडियावर सकारात्मकतेपेक्षा नकारात्मकता जास्त आहे”, असे दिग्दर्शक कबीर खान यांनी सांगितले. या मुलाखतीत दिग्दर्शक कबीर खान यांनी देशभक्ती आणि राष्ट्रवाद या विषयांवर मत व्यक्त केलं.

दिग्दर्शक कबीर खान पुढे म्हणाले की, “माझे नाव खान आहे आणि त्यामुळे मला पाकिस्तानला जा असे म्हंटले जाते. मी एकदा पाकिस्तानात गेलो होतो, तिथे लष्कर-ए-तैयबा ने मला भारतात परत जाण्यास सांगितले. त्यानुसार मी इथलाही नाही आणि तिथलाही नाही”, असे चित्रपट दिग्दर्शक कबीर खान यांनी सांगितले.

“प्रत्येक चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्याने आपले स्वतःचे अस्तित्व असले पाहिजे. आम्ही कधी कधी चित्रपटात तिरंगाही दाखवतो. परंतु आता देशभक्ती आणि राष्ट्रवाद यामध्ये मोठे अंतर पडले आहे, अशी खंत चित्रपट दिग्दर्शक कबीर खान यांनी व्यक्त केली. यावेळी कबीर खान यांनी स्वतः दिग्दर्शित आणि निर्मिती केलेल्या ‘८३’ या चित्रपटाचे उदाहरण दिले.

दिग्दर्शक कबीर खान यासंदर्भात बोलताना म्हणाले की, “राष्ट्रवादासाठी आपल्याला काउंटरपॉइंट खलनायक हवा आहे, परंतु देशभक्तीसाठी आपल्याला अशा कोणत्याही गोष्टीची गरज नाही.” या चित्रपटात रणवीर सिंगने कपिल देव यांची भूमिका साकारली होती. त्याचवेळी दीपिका पदुकोण त्याची पत्नी रोमी भाटियाच्या भूमिकेत दिसली होती.

महत्वाच्या बातम्या :-
RRR नंतर थलपथी विजय चित्रपटगृहात करणार धमाका, ‘BEAST’ चित्रपटाचा टीझर झाला रिलीज
तरुणीला खतरनाक स्टंट करणे पडले महागात, पाय सटकला अन् पडली पाण्यात, पहा व्हिडीओ
सरकारी शिक्षकाकडे मिळाला कुबेराचा खजिना, ३५ कॉलेज, २ बंगले, ४ कार्यालये आणि बरंच काही, वाचून हादराल

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now