बॉलीवूड कपल्सच्या लव्ह स्टोरीमध्ये खलनायक बनले होते आई वडील; बघा कोणत्या आहेत ‘त्या’ जोड्या

बॉलीवूड चित्रपटांमध्ये अनेक प्रेम कहाण्या दाखवल्या जातात. पण त्यातील प्रत्येक प्रेम कहाणी पुर्ण होत नाही. अनेक कहाण्या अपूर्ण राहतात. काही प्रेम कहाण्यांमध्ये त्यांचे आई वडील खलनायक बनतात. म्हणून त्या प्रेम कहाण्या कधीच पुर्ण होऊ शकत नाहीत.

आपण असे अनेक चित्रपट बघितले आहेत. ज्यामध्ये आई वडीलांमूळे लव्ह स्टोरी पुर्ण होऊ शकत नाही. पण खूप कमी लोकांना माहीती असेल की बॉलीवूड कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात देखील असे अनेक वेळा झाले आहे. त्यांच्या आई वडिलांमूळे प्रेम कहाणी पुर्ण होऊ शकली नाही.

कतरिना कैफ आणि रणबीर कपूर – सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये रणबीर आणि आलियाची जोडीची खुप जास्त चर्चा होत आहे. दोघे लवकरच लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. पण आलियाच्या अगोदर रणबीर आणि कतरिनाबद्दल चर्चा होती.

दोघे लग्न करणार असल्याचे बोलले जात होते. पण रणबीरचे वडील ऋषी कपूर यांना हे लग्न मान्य नव्हते. त्यांना कतरिनामध्ये कपूर घराण्याची सुन होण्याचे गुण दिसले नाहीत. म्हणून त्यांनी दोघांच्या लग्नाला नकार दिला. वडिलांच्या नकारामूळे दोघांचे ब्रेकअप झाले.

सारा आणि सुशांत – सुशांत सिंग राजपूत आज आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणी मात्र नेहमी आपल्यासोबत असणार आहेत. सुशांतच्या मृत्युनंतर त्याच्या आणि साराच्या नात्याबद्दल खुप जास्त चर्चा होत आहे. खुप कमी वेळात दोघांचे नाते खुप पुढे गेले होते.

पण दोघांचे प्रेम साराच्या घरच्यांना मान्य नव्हते. आई अमृता सिंगने साराला सुशांतसोबतचे सगळे नाते तोडायला लावले होते. आईच्या दबावामुळे साराने सुशांतसोबत ब्रेकअप केले होते. त्यानंतर साराने तिच्या करिअरवर लक्ष देण्यास सुरुवात केली होती.

ऐश्वर्या राय आणि सलमान खान – बॉलीवूडच्या सर्वात जास्त गाजलेल्या प्रेम कहाण्यांमध्ये ऐश्वर्या आणि सलमानच्या कहाणीचे नाव येते. दोघांच्या नात्याची खुप जास्त चर्चा झाली होती. पण हे नातं लग्नापर्यंत जाऊ शकले नाही.

अनेकांना असे वाटते की, सलमानच्या रागीट स्वभावामूळे त्यांचे ब्रेकअप झाले होते. पण खुप कमी लोकांना माहिती आहे की, ऐश्वर्याच्या वडीलांमूळे हे नातं तुटले होते. त्यांना सलमान आणि ऐश्वर्याचे प्रेम मान्य नव्हते. म्हणून त्यांनी ऐश्वर्याला सलमानपासून दूर व्हायला सांगितले होते. ऐश्वर्या वडिलांची गोष्ट टाळू शकत नव्हती म्हणून तिने ब्रेकअप केले.

महत्त्वाच्या बातम्या –

बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नात घातले होते सर्वात महाग दागिने; किंमत वाचून थक्क व्हाल

करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत अमिताभ बच्चन; पण त्यांचा भाऊ आजही जगतो हलाखीचे जीवन

कंगणा राणावत हाजीर हो; ‘या’प्रकरणात पुन्हा अडकली वादाची राणी

अरे देवा! सारा मोठ्या भावाला तर जान्हवी छोट्या भावाला करत होती डेट; ‘या’ व्यक्तिमूळे झाले ब्रेकअप

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.