सुशांत प्रकरणातील मीडियाच्या भूमिकेवर संतापले बॉलीवूडकर; म्हणाले..

मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर एनसीबीने रिया चक्रवर्तीला अटक केली आहे. न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून तिला यायालयीन कोठडी सुनावली आहे.

तसेच या प्रकरणात नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने रियाला अटक केल्यानंतर बॉलीवूड कलाकार रिया चक्रवर्तीच्या समर्थनात मैदानात उतरले आहेत. याचबरोबर या सर्वांनी मीडियाच्या नावे एक खुले पत्र लिहिले आहे.

सुशांतप्रकरणी रियाला दिल्या जात असलेल्या वागणुकीवर या सेलिब्रिटींनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. मीडियाच्या नावे लिहिलेल्या या खुल्या पत्रावर सोनम कपूर, झोया अख्तर, अनुराग कश्यप, अमृता सुभाष, रसिका दुग्गल, मिनी माथुर आदी सेलिब्रिटींच्या स्वाक्ष-या आहेत.

‘रिया को फसाओ’चा हा ड्रामा सुरू असल्याचे सेलिब्रिटींनी या पत्रामध्ये म्हटले आहे. ‘feminist voices’ नामक एका ब्लॉगवर हे खुले पत्र प्रकाशित करण्यात आले आहे. बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींसह सुमारे २५०० लोकांच्या या पत्रावर स्वाक्ष-या आहेत. ६० संघटनांनीही या पत्राला पाठींबा दिला आहे.

वाचा काय आहे पत्रात ?
प्रिय भारतातील प्रसार माध्यमे,
‘आम्हाला तुमची चिंता आहे. तुम्हाला ठिक वाटतेय का? कारण आम्ही माध्यमांना रिया चक्रवर्तीच्या मागे धावताना बघतो तेव्हा आम्हाला समजत नाही की तुम्ही पत्रकारितेच्या नैतिकतेचा त्याग केला आहे का? तुम्ही एका महिलेची सभ्यता आणि प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यापेक्षा कॅमेरे घेऊन या महिलेवर हल्ला करण्यात गुंतले आहात.

तुम्ही तिच्या वैयक्तिक आयुष्याचा भंग करीत आहात. ‘रिया को फसाओ’चा हा ड्रामा सुरू आहे. तुम्हाला केवळ एक स्टोरी तयार करण्याची घाई आहे. एक तरूणी जी आपले निर्णय स्वत: घेते, लग्नाशिवाय बॉयफ्रेंडबरोबर राहते आणि जी एखाद्या मजबूल स्त्रीऐवजी ती स्वत:साठी बोलत आहे. तर तिला विना चौकशी, कायदेशीर प्रक्रियेशिवाय तिला अपराधी ठरविले जाते.

सलमान खान आणि संजय दत्त यांच्या प्रकरणात आम्ही तुमचे दयाळू रूप पाहिले, मात्र, जेव्हा एका महिलेवर संकट ओढवले आहे, ज्या महिलेने कोणताही अपराध केला आहे का नाही हे अजून सिद्ध व्हायचे आहे तर तुम्ही तिच्या चरित्र्यावर वारंवार हल्ले करीत आहात. तिच्या कुटुंबीयावर निशाणा साधण्यासाठी सोशल मीडियावर लोकांना भडकवत आहात. तिच्या अटकेला स्वत:चा विजय दाखवत आहात. यामध्ये काय विजय आहे?

आम्ही बघतोय की, तुम्ही रिया चक्रवर्तीच्या मागे लागलेले आहात. आम्हाला समजत नाही, पत्रकारीतेच्या प्रत्येक मुल्याचा तुम्ही त्याग का केला आहे?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.